जग पोहोयलयं विनाशाच्या उंबरठ्याजवळ! याबाबत काय आहे जगप्रसिद्ध डूम्सडे घड्याळाची भविष्यवाणी, वाचा

डूम्सडे क्लॉक हे प्रतिकात्मक घड्याळ आहे जे मानवी क्रियांमुळे जागतिक आपत्तीच्या संभाव्यतेबद्दल सांगते. या घड्याळात मध्यरात्रीचे 12 वाजणे हे प्रचंड विनाशाचे लक्षण मानले जाते.

  जगप्रसिद्ध डूम्सडे क्लॉकनं (Doomsday Clock) वेळेसंदर्भात (Time) मोठी भविष्यवाणी केली आहे. जगाचा शेवट कधी होणार, हे सांगताना शास्त्रज्ञांनी तीन वर्षांत प्रथमच घड्याळात 10 सेकंदांची घट केली आहे, या घड्याळानुसार आता जगाच्या विनाशासाठी केवळ 90 सेकंद उरले आहेत. त्यामुळं जगभरात अनेकांची चिंता वाढलीय. 1947 पासून कार्यरत असलेले हे घड्याळ महासंहारापासून जग किती दूर उभे आहे हे सांगते.

  तीन वर्षांनी घड्याळात वेळ

  बदलली डूम्सडे क्लॉकची घोषणा करताना, बुलेटिन ऑफ द अॅटोमिक सायंटिस्ट्स (BAS) ने म्हटले आहे की रशियाचे युक्रेनवर सुरू असलेले आक्रमण, कोविड महामारी, हवामान संकट आणि जैविक धोके हे सर्वात मोठे धोके आहेत. शीतयुद्धाच्या उच्चतेच्या काळातही, डूम्सडे घड्याळ कधीही आपत्तीच्या इतके जवळ आले नव्हते. गेल्या तीन वर्षांपासून या घड्याळाचे काटे मध्यरात्रीपासून 100 सेकंदाच्या अंतरावर थांबले होते. त्यानंतर 100 सेकंदांवरच धोका थांबल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, त्यानंतर युक्रेन युद्धाच्या वाढत्या धोक्यांमुळे आपत्तीच्या एक पाऊल जवळ आले आहे.

  आपण धोक्याचा सामना करतोय – शास्त्रज्ञ 

  बीएएसचे अध्यक्ष आणि सीईओ रॅचेल ब्रॉन्सन यांनी सांगितले की, आपण अभूतपूर्व धोक्याच्या काळात जगत आहोत.  घड्याळाची वेळ ही वास्तविकता दर्शवते. ९० सेकंदांचे अंतर हे मध्यरात्रीपासून आतापर्यंतचे सर्वात जवळचे अंतर आहे. यूएस सरकार, त्याचे नाटो सहयोगी आणि युक्रेन यांच्याकडे संवादाचे अनेक माध्यम आहेत. घड्याळ मागे वळवण्याच्या पूर्ण क्षमतेने या सर्वांचा शोध घेण्याचे आम्ही नेत्यांना आवाहन करतो.

  डूम्सडे क्लॉक म्हणजे काय

  डूम्सडे क्लॉक हे प्रतिकात्मक घड्याळ आहे जे मानवी क्रियांमुळे जागतिक आपत्तीच्या संभाव्यतेबद्दल सांगते. या घड्याळात मध्यरात्रीचे 12 वाजणे हे प्रचंड विनाशाचे लक्षण मानले जाते. हे घड्याळ 1945 मध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या हल्ल्यांनंतर शास्त्रज्ञांनी जगाला मानवनिर्मित धोक्याचा इशारा देण्यासाठी तयार केले होते.

  डूम्सडे क्लॉक कसं काम करतं

  डूम्सडे क्लॉकसाठी धोक्याची पातळी अनेक स्केलवर मोजली जाते. युद्ध, शस्त्रे, हवामान बदल, विध्वंसक तंत्रज्ञान, प्रचार व्हिडिओ आणि अंतराळात शस्त्रे तैनात करण्याच्या प्रयत्नांसारख्या जागतिक हालचालींद्वारे त्याचे मूल्यांकन मोजले जाते. युद्धाच्या शेवटी, 1991 मध्ये, हे घड्याळ मध्यरात्रीपासून म्हणजे विनाशापासून जास्तीत जास्त 17 मिनिटे दूर होते.