डॉ. रूक्मिणी बॅनर्जी आणि प्रोफेसर एरिक हानुशेक यांना २०२१ चा यिदान पुरस्कार प्रदान

कठोर परीक्षण प्रक्रियेचे पालन करत, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांच्या स्वतंत्र परीक्षक समितीने डॉ. रूक्मिणी बॅनर्जी आणि प्रोफेसर एरिक ए. हानुशेक यांची २०२१ च्या शैक्षणिक संशोधन क्षेत्रातील यिदान पुरस्कारासाठी व शैक्षणिक विकास क्षेत्रातील यिदान पुरस्कारासाठी निवड केली.

  • शिक्षण क्षेत्रातील जगातील सर्वोच्च सन्मान

हाँगकाँग : डॉ. रूक्मिणी बॅनर्जी आणि प्रोफेसर एरिक हानुशेक यांना २०२१ चा यिदान पुरस्कार हा शिक्षण क्षेत्रातील जगातील सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रातील एका महत्त्वाच्या समीकरणाची उकल करताना : शिक्षणाचा दर्जा आणि व्यापक पातळीवर शिक्षणार्थींसाठी निष्कर्ष उंचावण्यासंदर्भात केलेल्या असामान्य कामाची दखल घेत हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.

कठोर परीक्षण प्रक्रियेचे पालन करत, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांच्या स्वतंत्र परीक्षक समितीने डॉ. रूक्मिणी बॅनर्जी आणि प्रोफेसर एरिक ए. हानुशेक यांची २०२१ च्या शैक्षणिक संशोधन क्षेत्रातील यिदान पुरस्कारासाठी व शैक्षणिक विकास क्षेत्रातील यिदान पुरस्कारासाठी निवड केली. २०१६ मध्ये स्थापना झाल्यापासून देण्यात आलेल्या नऊ माननीय यिदान पुरस्कारार्थींच्या यादीत आता त्यांचा समावेश होणार आहे. शिक्षण क्षेत्रात प्रगती आणि बदलाला प्रेरणा देणाऱ्या जागतिक पातळीवरील यिदान प्राइड फाउंडेशनने या पुरस्कारांची सुरुवात केली आहे.

अध्यापनाचा दर्जा व शिक्षणाची निष्पत्ती उंचावण्यासाठी २०२१ च्या पुरस्कारार्थींना मदत करणार

प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूक्मिणी बॅनर्जी यांनी शैक्षणिक निष्पत्ती क्षेत्रात केलेल्या कामासाठी त्यांना २०२१ यिदान प्राइज फॉर एज्युकेशन डेव्हलपमेंट हा पुरस्कार देण्यात आला. शाळेत काही वर्ष शिकल्यानंतरही लहान मुलांमधील साक्षरता व सांख्यिकतेत उणीवा असल्याचे डॉ. बॅनर्जी व त्यांच्या भारतातील टीमने सुरू केलेल्या अन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट (एएसईआर) या विश्लेषण पद्धतीमुळे निदर्शनास आले. दिसून आलेल्या, या उणीवा भरून काढण्यासाठी त्यांच्या टीमने शाळा व स्थानिक समाजांत ‘टीचिंग अट राइट लेव्हल’ (TaRL) प्रोग्रॅम सुरू करून त्याद्वारे मूलभूत वाचन, अंकगणित कौशल्य शिकवले जाते व कोणतेही मूल मागे पडणार नाही याची खबरदारी घेतली जाते. हे पद्धतशीर, अनुकरणीय मॉडेल दरवर्षी देशभरातील लाखो मुलांपर्यंत पोहोचत असून जगभरात त्याचा प्रसार होत आहे.

‘डॉ. रूक्मिणी बॅनर्जी आणि प्रथम टीमने स्पष्ट ध्येय ठेवले आहे – प्रत्येक मूल शाळेत आणि योग्य रीतीने शिकत आहे.’ केवळ शाळा प्रवेशाच्या संख्येवर नाही, तर शिक्षणाच्या दर्जावर लक्ष केंद्रित करायला हवे याची आपल्या सगळ्यांनाच आठवण करून द्यायला हवी. या ध्येयाच्या दिशेने अमलात आणण्यात आलेल्या उपाययोजना किफायतशीर आणि व्यापक असून जागतिक स्तरावर प्रभाव टाकण्याची त्यांची क्षमता – शैक्षणिक क्षेत्रातील क्रांतीकारी नाविन्य आणि त्यांचे रुपांतर घडवून आणणारे बदल दिसून आले आहेत,’ असे यिदान पुरस्कार शिक्षण विकास परीक्षक मंडळाच्या प्रमुख आणि युनेस्को इन्स्टिट्यूट फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजिस इन एज्युकेशनच्या संचालक मंडळ सदस्य डोरोथी के. गॉर्डन म्हणाल्या.

यिदान पुरस्काराच्या मदतीने लहान मुलांशी संबंधित क्षेत्रातील आपले काम बळकट करून मुलांच्या आयुष्याचा पाया अगदी लहानपणीच रचण्याचे डॉ. बॅनर्जी यांनी ठरवले आहे. डॉ. बॅनर्जी यांच्या मते, या पुरस्कारामुळे ‘प्रत्येक मूल शाळेत आणि योग्य शिक्षण घेत आहे’ हे ध्येय साकार करण्यासाठी लक्षणीय योगदान मिळेल.

प्रोफेसर एरिक ए. हानुशेक, पॉल अँड जीन हॅना सीनीअर फेलो, हूवर इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी यांना २०२१ यिदान प्राइज फॉर एज्युकेशन रिसर्च प्रदान करण्यात आला आहे. शिक्षणाची निष्पत्ती आणि अध्यापनाच्या दर्जाचे महत्त्व यांवर त्यांचे काम लक्ष केंद्रित करणारे असून त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर याविषयीचे संशोधन व धोरण अशा दोन्ही घटकांमध्ये रूपांतर घडवून आणले आहे. त्यांच्या कामामुळे संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास ध्येय ४ ला आकार देणे (सर्वसमावेशक आणि समान दर्जा शिक्षणाची खात्री) शक्य झाले असून त्यासाठी शिक्षण निष्पत्तीची ध्येये नव्याने प्रस्थापित केली. त्याचप्रमाणे विद्यार्थी शाळेत किती वर्ष व्यतीत करतात यापेक्षा किती शिकतात यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते हे ही दाखवून दिले.

‘इतर कोणालाही आजवर एरिक यांच्याप्रमाणे शिक्षण आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांची सांगड घालणे जमलेले नाही. शिक्षकांच्या कामगिरीचे मोजमाप करण्यासाठी अधिक चांगली व न्याय्य यंत्रणा तयार करण्यापासून अधिक चांगल्या शिक्षण निष्पत्तीचा दीर्घकालीन आर्थिक व सामाजिक प्रगतीशी संबंध लावण्यापर्यंत त्यांनी कठोर आर्थिक विश्लेषणासाठी शैक्षणिक धोरणांची मोठी श्रेणी पालन करण्यायोग्य बनवली,’ असे यिदान प्राइज फॉर एज्युकेशन रिसर्च परीक्षक मंडळाचे प्रमुख अँड्रियाज श्लायकर म्हणाले.

यिदान पुरस्कार निधीच्या मदतीने प्रोफेसर हानुशेक यांनी आफ्रिकेत रिसर्च फेलो प्रोग्रॅम राबवण्याचे व त्यातून विश्लेषणात्मक क्षमतेला आधार देत स्थानिक दृष्टीकोनातून शैक्षणिक धोरणांना आकार देण्याचे ठरवले आहे.

पुरस्कारार्थींची आतापर्यंतची सर्वात वैविध्यपूर्ण श्रेणी

‘या वर्षीच्या नामांकनांचा दर्जा व वैविध्य शिक्षण क्षेत्रात नवा दृष्टिकोन आणण्यासाठी जगभरातील लोकांची तळमळ व ध्यास दर्शवणारे आहे. आमच्या नामांकित (नॉमिनी) व्यक्ती १३० देशप्रदेशांतील प्रकल्पांवर काम करत आहेत. ते शैक्षणिक यंत्रणेचा, विषमता हाताळण्याचा आणि शिक्षणार्थींना सक्षम करण्याचा वरच्या पातळीपासून तळापर्यंतचा पुनर्विचार करत आहेत,’ असे यिदान पुरस्कार परीक्षक मंडळाचे अध्यक्ष आणि युनेस्कोचे माजी महासंचालक डॉ. कोईचिरो मात्सुरा म्हणाले.

‘परीक्षक मंडळात पाच नव्या परीक्षकांचे स्वागत करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे – नवा दृष्टिकोन समाविष्ट करणे, स्त्रिया तसेच वैविध्यपूर्ण प्रदेशातील प्रतिनिधींचा आवाज मजबूत करून जगातील काही सर्वात बुद्धीमान व्यक्तींकडून आलेल्या संकल्पनांवर चर्चा करणे हे त्यातून साध्य होणार आहे.’

यिदान पुरस्कार समिती जागतिक शिक्षण क्षेत्रातील आव्हांनावर प्रभावशाली ठरत आहे.

प्रत्येक विजेत्याला ३० दशलक्ष हाँग काँग डॉलर्सची (अंदाजे ३.९ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स) रक्कम दिली जाणार असून त्यापैकी निम्मी रक्कम प्रकल्प निधी आहे. हा निधी नाविन्यपूर्ण आणि प्रगतीशील शैक्षणिक प्रकल्पांची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि जगभरातील लाखो शिक्षणार्थींना मदत करण्यासाठी वापरता येणार आहे.

यिदान पुरस्काराचे सर्व Yidan Prize laureates Council of Luminaries मध्ये सहभागी होऊन एकत्रितपणे मान्यवर शैक्षणिक क्षेत्रातील लीडर्सबरोबर काम करतील. कौन्सिल एकत्रितपणे काम करते तसेच नाविन्यपूर्ण संकल्पनांसह शिक्षणाचा पुनर्विचार व पुनर्संचय करण्याचे महत्त्व प्रकाशझोतात आणण्यासाठी एकत्रितपणे आवाज उठवत आहे. वैविध्यपूर्ण तज्ज्ञ व त्यांचे ज्ञान सामाईक करत त्यांनी युनेस्को फ्युचर्स ऑफ एज्युकेशन उपक्रमाला या विषयात योगदान दिले आहे. त्याशिवाय ते ग्लोबल माइंडसेट उपक्रमाबरोबर काम करून विकास मानसिकतेवर संशोधनाचा पाया रचून जगभरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी काम करत आहे. त्यांनी आतापर्यंत एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या इंटरनॅशनल स्किल्स फोरम सारख्या उच्च स्तरीय परिषदांमध्ये विचार मांडत न्यू नॉर्मलसाठी शिक्षणात आवश्यक नाविन्यतेवर चर्चा केली आहे.

२०२० यिदान पुरस्काराची नामांकने १९ ऑक्टोबर रोजी खुली होणार

सध्या पाचव्या वर्षात असलेल्या यिदान पुरस्कारांसाठी उच्च दर्जाची नामांकने व जगभरातील शिक्षणार्थींपर्यंत पोहोचणारे व सकारात्मक परिणाम घडवणारे प्रकल्प येतात. ते वैविध्यपूर्ण दृष्टिकोन, संस्कृती व भौगोलिकता यांचे प्रतिनिधीत्व करतात. २०२० यिदान पुरस्कारासाठीची नामांकने १९ ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत खुली राहतील.

दरम्यान, २०२१ चे विजेते औपचारिकदृष्ट्या यिदान पुरस्कारांचा स्वीकार करतील. पुरस्कार प्रदान समारंभ आणि यिदान पुरस्कार वार्षिक शिखर परिषद ५ डिसेंबर २०२१ रोजी होईल.