ड्रॅगनने अमेरिकेच्या सेंटरकडून डिलीट केली कोरोना विषाणूची प्राथमिक माहिती, तज्ञांनी पु्न्हा मिळवून केला धक्कादायक खुलासा…

चीनने ही माहिती डिलीट केल्यामुळे कोरोना व्हायरची उत्पत्ती कुठून आणि कशी झाली ? याचा तपास करणं अवघड झालं आहे. अमेरिकेच्या सिएटलमधील फ्रेड हचिन्सन कर्करोग संशोधन केंद्रातील विषाणूविज्ञानी आणि जीवशास्त्रज्ञ प्रोफेसर जेस ब्लूम यांनी सांगितलं की, खरी माहिती समोर येऊ नये, यासाठी चीनने आकड्यांमध्ये फेरबदल करत डेटाबेसमधून माहिती काढून टाकली.

  कोरोना व्हायरसचं संकट संपूर्ण जगभरात पसरलं असून भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. परंतु चीनमध्ये कोरोनाचा धोका कमी झाला असून संपूर्ण जगभरात मागील दीड वर्षांपासून झालेल्या उत्पत्तीवरून अनेक प्रकारचे आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. कोरोना विषाणू संदर्भातील माहिती चीन अजूनही लपवत असल्याचे आरोप केले जात आहेत. तसेच हे आरोप आता सत्यात उतरताना दिसत आहेत. एका अहवालाने दिलेल्या माहितीनुसार, चीनने एका नव्या युक्तीचा वापर करत आणि डाव साधत अमेरिकेच्या सेंटरकडून कोरोना विषाणूची प्राथमिक माहिती डिलीट केली.

  चीनने ही माहिती डिलीट केल्यामुळे कोरोना व्हायरची उत्पत्ती कुठून आणि कशी झाली ? याचा तपास करणं अवघड झालं आहे. अमेरिकेच्या सिएटलमधील फ्रेड हचिन्सन कर्करोग संशोधन केंद्रातील विषाणूविज्ञानी आणि जीवशास्त्रज्ञ प्रोफेसर जेस ब्लूम यांनी सांगितलं की, खरी माहिती समोर येऊ नये, यासाठी चीनने आकड्यांमध्ये फेरबदल करत डेटाबेसमधून माहिती काढून टाकली. परंतु संशोधक जेस ब्लूम यांनी दावा करत सांगितलं की, वुहान शहरामध्ये सुरूवातीला २४१ इतक्या कोरोना रूग्णांच्या आकड्यांमधून १३ रूग्णांची माहिती पुन्हा एकदा मिळवण्यात यश आलं आहे. जी माहिती डिलीट करण्यात आली होती. ती माहिती पुन्हा एकदा मिळाली आहे.

  तीन महिन्यानंतर डिलीट केले आकडे

  कोरोना संक्रमितांचे नमुने आणि आकडे अमेरिकेच्या सीक्वन्स रीड अर्काइवमध्ये मार्च २०२० साली गोळा करण्यात आले होते. परंतु तीन महिन्यानंतर या आकड्यांविषयी माहिती संशोधकांनी काढून टाकण्याची विनंती केली. अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या माहितीनुसार, जी माहिती डिलीट करण्यात आली. ती माहिती वुहानमध्ये कोरोनाचे नमुने आणि आकड्यांविषयी होती. पुढे त्यांनी सांगितलं की, माहिती गोळा करणाऱ्या संशोधकांना माहिती डिलीट करण्याचा आणि काढून टाकण्याचा परिपूर्ण अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी असं केलं आहे की नाही? याबाबत अंदाज लावणं जरा कठीण आहे.

  अपडेट करणार असल्याचं सांगून माहिती डिलीट केली

  चीनच्या संशोधकांनी माहिती काढून टाकते वेळी सांगितलं की, स्वीक्वेन्सनुसार संपूर्ण माहिती अपडेट करण्यात आली आहे आणि या माहितीला दुसऱ्या डेटाबेसवर जमा करण्यात येणार आहे. पुढे त्यांनी सांगितलं की, अमेरिकेच्या डेटाबेसमधून हे आकडे काढून टाकण्यात यावेत, जेणेकरून भविष्यकाळात कोणतीही समस्या निर्माण होणार नाही.

  चीनमध्ये सर्वात आधीच पसरला होता कोरोना विषाणू, ब्लूम यांचा आरोप

  मी आधीच तुम्हाला सूचित केले होते की, चीनच्या अधिकृत घोेषणेच्या आधीच चीनमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होत होता, परंतु चीनने ही माहिती सगळ्यांपासून लपवली होती.