परंपरेमुळे व्लादिमीर पुतीन यांनी नरेंद्र मोदींना शुभेच्छा देणे टाळले

पुतीन यांनी 'आमच्या परंपरेनुसार तुम्हाला आधी शुभेच्छा देऊ शकत नाही', असे म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे नाकारले. मात्र भविष्यातील वाढचालीसाठी शुभेच्छा दिल्या. व्लादिमीर पुतीन यांनी मोदींच्या भेटीदरम्यान त्यांना शुभेच्छा देताना रशियाच्या एका पद्धतीचाही उल्लेख केला.

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना आज वाढदिवसानिमित्त (Birthday) जगभरातून शुभेच्छा येत आहेत. त्यातच मोदी नुकतेच उझबेकिस्तानहून (Uzbekistan) भारतात परतले असून या दौऱ्यात त्यांनी शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (Shanghai Co-Operation Orgnisation) बैठकीच्या निमित्ताने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांची भेट घेतली.

    पुतीन यांनी ‘आमच्या परंपरेनुसार तुम्हाला आधी शुभेच्छा देऊ शकत नाही’, असे म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे नाकारले. मात्र भविष्यातील वाढचालीसाठी शुभेच्छा दिल्या. व्लादिमीर पुतीन यांनी मोदींच्या भेटीदरम्यान त्यांना शुभेच्छा देताना रशियाच्या एका पद्धतीचाही उल्लेख केला.

    माझे प्रिय मित्र मोदी..उद्या तुमचा वाढदिवस आहे. पण रशियातील आमच्या प्रथेनुसार आम्ही प्रत्यक्ष वाढदिवसाच्या आधी शुभेच्छा देत नाहीत. त्यामुळे मी तुम्हाला आत्ता शुभेच्छा देऊ शकत नाही. पण तुमच्या वाढदिवसाबद्दल आम्हाला माहिती आहे याची तुम्ही नोंद घ्यावी असे आम्हाला वाटते. पण आत्ता तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो. आम्ही आमचे मित्रराष्ट्र भारताला शुभेच्छा देतो. भारताची समृद्धी व्हावी अशी कामना करतो, असे पुतीन म्हणाले.