इंडोनेशियाच्या जावा बेटावर भूकंपाचे धक्के; किमान २० जणांचा मृत्यू

जावा बेटावर ५.४ तीव्रतेचा भूकंप झाला आहे. या धक्क्याने किमान २० जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३०० जण जखमी झाले आहेत. एका अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, सुमारे डझनभर इमारतींचे नुकसान झाले आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार भूकंपाचे केंद्र पश्चिम जावा प्रांतातील सियांजूर भागात असून त्याची खोली १० किलोमीटर होती.

    जकार्ता – इंडोनेशियाच्या (Indonesia) जावा बेटावर ५.४ तीव्रतेचा भूकंप (Earthquake) झाला आहे. या धक्क्याने किमान २० जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३०० जण जखमी झाले आहेत. एका अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, सुमारे डझनभर इमारतींचे (Building Collapse) नुकसान झाले आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार (US Geological Survey), भूकंपाचे केंद्र पश्चिम जावा प्रांतातील सियांजूर भागात असून त्याची खोली १० किलोमीटर होती.

    सियांजूर (Cianjur) जिल्ह्यातील स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, भूकंपाने घरांसह डझनभर इमारतींचे नुकसान झाले आहे. ग्रेटर जकार्ता परिसरात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. राजधानीतील गगनचुंबी इमारती तीन मिनिटांपेक्षा जास्त काळ हादरल्या आणि काहींना बाहेर काढण्यात आले आहे.

    दक्षिण जकार्ता येथील कर्मचारी विदी प्रीमाधनिया यांनी सांगितले की, भूकंप खूप जोरदार जाणवला… माझे सहकारी आणि मी नवव्या मजल्यावर असलेल्या आपत्कालीन पायऱ्यांसह आमच्या कार्यालयातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, काही लोकांनी जकार्ताच्या मध्यवर्ती व्यवसाय जिल्ह्यात कार्यालये रिकामी केली, तर काहींना इमारती हादरल्या आणि फर्निचर हलताना दिसले.