अफगाणिस्तानात भुंकप, २५० लोकांचा मृत्यू

"दुर्दैवाने, काल रात्री पक्तिका प्रांतातील चार जिल्ह्यांमध्ये झालेल्या तीव्र भूकंपामुळे देशभरातील शेकडो लोक ठार आणि जखमी झाले. याशिवाय अनेक घरांचे नुकसान झाले आहे. अशी माहिती सरकारचे प्रवक्ते बिलाल करीमी यांनी ट्विट करत दिली.

    अफगाणिस्तानात बुधवारी जोरदार भूकंप झाल्याची (Earthquake In Afghanistan) माहिती आहे. भुंकपाचं केंद्र हे पक्तिका प्रांत असून सुमारे 6 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचं सांगण्यात येत आहे. या भुंकपामुळे सुमारे २५० जणांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानच्या बख्तर या सरकारी वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. अजूनही बचाव कार्य सुरू असून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे.

    अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतात स्थानिकांना भुंकपाचे धक्के जाणवले. या घटनेत जवळपास दीडशेहून अधिक लोक जखमी झाले आहेत. दक्षिण-पूर्वेकडील खोस्ट शहरापासून सुमारे 44 किलोमीटर (27 मैल) अंतरावर भूकंप झाला. रॉयटर्सने युरोपियन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, पाकिस्तान आणि भारतापर्यंत 500 किलोमीटर अंतरापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले.

    पाकिस्तानपर्यंत भुंकपाचे धक्के

    अफगाणिस्तानची राजधानी काबूल ते पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत भूकंपाचे धक्के प्रत्यक्षदर्शींना जाणवल्याचे केंद्राने म्हटले आहे. “दुर्दैवाने, काल रात्री पक्तिका प्रांतातील चार जिल्ह्यांमध्ये झालेल्या तीव्र भूकंपामुळे देशभरातील शेकडो लोक ठार आणि जखमी झाले. याशिवाय अनेक घरांचे नुकसान झाले आहे. अशी माहिती सरकारचे प्रवक्ते बिलाल करीमी यांनी ट्विट करत दिली. तसच त्यांनी लोकांना मदत करण्याचं नागरिकांना आवाहन केलं.