बंगालच्या उपसागरात 4.4 तीव्रतेचा भूकंप, सुदैवाने जिवीतहानी किंवा वित्तहानी नाही!

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, सोमवारी पहाटे बंगालच्या उपसागरात ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मात्र अद्याप कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही.

    मोरोक्कोमध्ये तीन दिवसापुर्वी मोठा भूकंप (Morocco Earthquake) झाला. या भुंकपाने संपूर्ण देश हादरला असून आतापर्यंत जवळपास 2000 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही घटना ताजी असतानाच आाता बंगालचा उपसागरात भूकंप झाल्याची माहिती समोर येत आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, बंगालच्या उपसागरात सोमवारी पहाटे ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला. मात्र अद्याप कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही. सोमवारी पहाटे एक वाजून २९ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची खोली सुमारे 70 किलोमीटर होती.

    अफगाणिस्तानपर्यंत जाणवले हादरे

    वृत्तानुसार, यापूर्वी अफगाणिस्तानपासून तिबेटपर्यंत पृथ्वी थरथरत होती. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, मोरोक्कोमध्ये गेल्या शुक्रवारी आलेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला असून 2000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरनुसार, भूकंपाची खोली 70 किलोमीटरपर्यंत होती आणि सोमवारी रात्री 1.29 वाजता तो आला. ४.४ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के ६ सेकंद जाणवले. याआधी अफगाणिस्तान आणि तिबेटमध्ये भूकंपामुळे लोक घाबरले होते पण आजपर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

    मोरोक्कोतील भूकंपात 2000 लोकांचा मृत्यू

    8 सप्टेंबरच्या रात्री मोरोक्कोमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपात जवळपास 2100 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दोन हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी 1400 हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मोरोक्कोमधील भारतीय दूतावासाने एक सल्लागार जारी केला आहे आणि लोकांना घरी सुरक्षित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे दूतावासाने म्हटले आहे.