मेक्सिकोत भूकंपाचे धक्के; इमारतींचे नुकसान, नैसर्गिक हानी

मेक्सिको येथे भूकंपाचे धक्के बसले आहेत. यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून कमी लोकवस्ती असलेल्या पश्चिम मेक्सिकोमध्ये ७.६ रिश्टर स्केल तीव्रता असल्याचे सांगण्यात येत आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार, हा भूकंप १५ किमी खोल असून पश्चिम किनार्‍याजवळील कोलिमा राज्याच्या मिचोआकान सीमेजवळ आला असल्याची माहिती आहे.

    मेक्सिको सिटी : मेक्सिको (Mexico) येथे भूकंपाचे (Earthquake) धक्के बसले आहेत. यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून कमी लोकवस्ती असलेल्या पश्चिम मेक्सिकोमध्ये ७.६ रिश्टर स्केल तीव्रता असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, भूकंपाचे धक्के एवढे तीव्र होते की, मेक्सिको सिटीपासून दूर असलेली झाडे आणि इमारतींचे नुकसान झाले आहे.

    यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, हा भूकंप १५ किमी खोल असून पश्चिम किनार्‍याजवळील कोलिमा (Kolyma) राज्याच्या मिचोआकान सीमेजवळ आला असल्याची माहिती आहे. तसेच, पॅसिफिक बंदर मंझानिलो (Port Manzanillo) येथे डिपार्टमेंट स्टोअरचे छत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. १९८५ आणि २०१७ मध्ये झालेल्या दोन विनाशकारी भूकंपासारखाच हा भूकंप असल्याचे सांगितले जात आहे.

    भूकंपात इमारती, घरे, दुकाने आणि झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भूकंपानंतर, यूएस पॅसिफिक त्सुनामी चेतावणी केंद्राने मेक्सिकोच्या किनारपट्टीच्या काही भागांसाठी अलर्ट जारी केला होता.