सीरियाजवळ बोट बुडून ८६ जणांना जलसमाधी, मृतांमध्ये लेबनॉन आणि सीरियातील अनेक जण

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बोट २० सप्टेंबर रोजी लेबनॉनमधील पोर्ट त्रिपोलीजवळच्या मिनेह येथून निघाली होते. येथून प्रवासी बोटीत बसले. २२ सप्टेंबर रोजी बोट बुडाली. यामध्ये ८६ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून अनेक जण बेपत्ता आहेत.

    नवी दिल्ली – सीरियाजवळ २२ सप्टेंबर रोजी समुद्रात बोट बुडाली. २३ सप्टेंबरला या बोटीची ओळख पटली. या बोटीतून लेबनॉन आणि सीरियाचे एकूण १५० प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ८६ जणांचा बुडून मृत्यू झाला. बोटीतील सर्व लोक आपला देश सोडून दुसऱ्या देशात आश्रय घेण्यासाठी जात होते. सीरियाच्या आरोग्य मंत्रालयाने याला दुजोरा दिला आहे.

    अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बोट २० सप्टेंबर रोजी लेबनॉनमधील पोर्ट त्रिपोलीजवळच्या मिनेह येथून निघाली होते. येथून प्रवासी बोटीत बसले. २२ सप्टेंबर रोजी बोट बुडाली. यामध्ये ८६ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून अनेक जण बेपत्ता आहेत. सर्वांचा शोध सुरू आहे. सीरियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मरण पावलेल्यांचे नातेवाईक ओळख पटवण्यासाठी सीरियात येत आहेत.