मास्कची सवय लावून घ्या बुवा, पुढील काही वर्ष सुटका नाही- इंग्लंडमधील तज्ञांचे मोठे विधान

पुढील काही वर्षांसाठी आपल्या सगळ्यांनाच सोशल डिस्टन्सिंग आणि तोंडावर मास्क घालून फिरावं लागणार असल्याचं डॉ. रॅमसे (we have to wear mask and follow social distancing for next few years)यांनी म्हटलं आहे.

    कोरोनाबाधितांचा(corona) आकडा रोज वाढताना दिसत आहे. लस आली असली तरी कोरोनाविषयक नियम पाळणे आपल्या सगळ्यांसाठी आवश्यक आहे. आपली या मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगमधून सध्या तरी सुटका होणार नसल्याच दिसत आहे. अशातच  इंग्लंडमधील नागरी आरोग्य विभागाच्या लसीकरण विभागाच्या प्रमुख डॉ. मेरी रॅमसे यांनी मोठे विधान केले आहे. पुढील काही वर्षांसाठी आपल्या सगळ्यांनाच सोशल डिस्टन्सिंग आणि तोंडावर मास्क घालून फिरावं लागणार असल्याचं डॉ. रॅमसे यांनी म्हटलं आहे.

    डॉ. रॅमसे यांनी कोरोनानंतर आलेल्या निर्बंधांची सवय लावून घ्यावी लागणार असल्याचं म्हटलं आहे. पुढील काही वर्षांसाठी हे नियम पाळावे लागतील. सरकारलाही कोणतेही निर्बंध हटवण्याआधी विचार करावा लागेल, असेही त्यांनी म्हटलं आहे.

    डॉ. रॅमसे पुढे म्हणाल्या, जास्त उपस्थिती असणाऱ्या कार्यक्रमांवर आयोजकांबरोबरच प्रशासनालाही अधिक लक्ष द्यावं लागणार आहे. तसेच या अशा कार्यक्रमांसंदर्भात स्पष्ट निर्देश आणि नियम आखून देण्याचीही गरज आहे. जगभरातील  सरकारी यंत्रणांनी विचारपूर्वक पद्धतीने निर्बंध उठवण्यासंदर्भात निर्णय घेणं गरजेचं आहे. कोणीही तातडीने निर्बंध उठवण्याची घाई करु नये. वयस्कर व्यक्तींना आणि इतर आजार असणाऱ्यांना कोरोना संसर्गाची अधिक भीती आहे, असेही त्या म्हणाल्या. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर आणि परिस्थिती अगदी पूर्णपणे पुर्ववत झाल्यावरच निर्बंध उठवण्यात अर्थ आहे.