मला माझ्या करोडपती मुलाचा अभिमान नाही, एलन मस्क यांच्या वडिलांचा मुलाखतीत गौप्स्फोट

ऑस्ट्रेलियन रेडिओ स्टेशन KIIS FM वर 'काईल आणि जॅकी ओ' या कार्यक्रमात सोमवारी त्यांनी मुलाखत दिली. टेस्ला प्रमुख एलन आणि कुटुंबातील इतरांबद्दल एरोल यांनी अनेक खुलासे केले आहेत. ते म्हणाले की, एलन मस्कचा धाकटा भाऊ व माझा लहानामुलगा किंबल मस्क मला आनंददायी व अभिमानास्पद वाटतो.

    नवी दिल्ली – जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या एलन मस्कचे वडील एरोल मस्क यांनी एका मुलाखतीत अजब गौफ्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, मला माझ्या करोडपती मुलाचा अभिमान वाटत नाही. कारण संपूर्ण मस्क कुटुंबाने दिर्घकाळात बरेच काही साध्य केलेले आहे.

    ऑस्ट्रेलियन रेडिओ स्टेशन KIIS FM वर ‘काईल आणि जॅकी ओ’ या कार्यक्रमात सोमवारी त्यांनी मुलाखत दिली. टेस्ला प्रमुख एलन आणि कुटुंबातील इतरांबद्दल एरोल यांनी अनेक खुलासे केले आहेत. ते म्हणाले की, एलन मस्कचा धाकटा भाऊ व माझा लहानामुलगा किंबल मस्क मला आनंददायी व अभिमानास्पद वाटतो. तर मुलाखतीत पुढे बोलताना करोडपती मुलगा एलन मस्कच्या यशाला कमी लेखले आहे. त्यांच्या शारिरीक स्वरूपाबाबतही त्यांनी वक्तव्य केले.

    रेडिओ जॅकी याने विचारले की, तुमचा मुलगा प्रतिभावान व्यक्ती आहे. त्याच्याकडे खूप पैसा आहे. त्याने खूप काही कमविले आहे. तुम्हाला याचा अभिमान आहे का ? तेव्हा ७६ वर्षीय एरोल मस्क यांनी स्पष्ट भाषेत नाही उत्तर दिले. ते म्हणाले की, आमचे कुटुंब हे बऱ्याच वर्षांपासून खूप काही नवीन करीत आहे. असे नाही की आम्ही अचानक मोठे झालो आहोत. अचानक कोणतीच गोष्ट झालेली नाही आणि होतही नाही.