ना मास्कची सक्ती ना लसीकरणाची गरज, जगातल्या ‘या’ देशाने घेतलाय मोठा निर्णय – वाचा सविस्तर

स्पेन सरकारने (Spain) कोरोनाला सामान्य फ्लू मानले आहे. (No Mask And Vaccine Required In This Country) यासोबतच लोकांना सोबत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    इटली : कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क  (Mask) आणि लसीकरण (Vaccination) या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मात्र युरोपियन देशांमध्ये (European Countries) यातून सूट देण्यात आली आहे. युरोपियन देशांपैकी एका देशात मास्क आणि लसीकरणापासून नागरिकांची सुटका केली आहे. युरोपमधील देशांमध्ये मास्क आणि लसींची (Masks and Vaccines) आवश्यकता हटवण्यात येत आहे. स्पेन सरकारने (Spain) कोरोनाला सामान्य फ्लू मानले आहे. यासोबतच लोकांना सोबत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    केवळ मास्कच नाही, तर तिथली सरकार कोरोना लसीची आवश्यकता देखील हटवण्याची शक्यता आहे. सरकारचा विश्वास आहे की, कोरोनाचे केवळ ओमायक्रॉन व्हेरिएंट महामारीला शेवटच्या उंबरठ्यावर घेऊन जाईल आणि ही प्रक्रिया सुरू झाली आहे. यूकेचे शिक्षण सचिव म्हणाले की, यूके आता साथीच्या रोगापासून स्थानिक पातळीवर जात आहे.

    तज्ज्ञांच्या मते, ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता खूपच कमी आहे. यासोबतच मृतांचा आकडाही कमी नोंदवला जात आहे. अशा परिस्थितीत स्पेनचे पंतप्रधान प्रेडो सांचेज यांनी साथीच्या काळात लादलेले निर्बंध संपवून सामान्य जीवनात परतण्याचा निर्णय घेतला आहे.

    ते म्हणाले की, आता ते महामारीच्या समाप्तीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात गुंतले आहेत. मात्र युरोपची सरकारे कदाचित वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर त्याचे तुलना करत आहेत. दुसरीकडे, आयर्लंडमध्ये वाढत्या कोरोना प्रकरणांना न जुमानता, एक स्वैच्छिक लसीकरण प्रणाली तयार केली जात आहे. सरकारला आता लसीकरणाच्या बाबतीत स्वतःहून निर्णय घेण्याचा अधिकार लोकांना द्यायचा आहे.

    याशिवाय अनेक देशांनी क्वारंटाइन कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच अत्यावश्यक सेवांवर कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही. चेक रिपब्लिकनं अलीकडेच आयसोलेशन कालावधी दोन आठवड्यांवरून केवळ 5 दिवसांवर आणला आहे. येत्या काही दिवसांत इतर युरोपीय देशांनीही आपले निर्बंध शिथिल केले तर गेल्या वर्षीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, डेन्मार्कमध्ये देखील निर्बंध हटविण्यात आले आहेत आणि मास्क आवश्यक मानले जात नाहीत. नेदरलँड सरकारनेही असाच निर्णय घेतला असून तेथे मास्क घालणे आता बंधनकारक नाही.