चीनमध्ये पुराचा कहर, ४३ हजार हेक्टरवरील पिकांची नासाडी

पुरामुळे आतापर्यंत ७ कोटी डॉलर्स इतके थेट नुकसान झाले आहे. त्याचवेळी मान्सून यांगत्से नदीच्या खोऱ्याकडे सरकल्याने पाण्याची पातळी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

    नवी दिल्ली – चीनच्या जिआंगशी (Flood Danger In China ) प्रांतात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. (43,000 Hectares Of Crops Destroyed)  जिआंगशीच्या ५५ प्रांतांमध्ये पाऊस आणि पुरामुळे पाच लाख लोक ( 5 Million People) बाधित झाले आहेत, तर ४३,३०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सध्या पाऊस थांबल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी या प्रांतात पुन्हा पाऊस होण्याचा दावा हवामान खात्याने केला आहे.

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुरामुळे आतापर्यंत ७ कोटी डॉलर्स इतके थेट नुकसान झाले आहे. त्याचवेळी मान्सून यांगत्से नदीच्या खोऱ्याकडे सरकल्याने पाण्याची पातळी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. जलविज्ञान केंद्रांनी पाण्याच्या पातळीबाबत रेड अलर्ट जारी केला आहे.

    जिआंग्शीच्या मध्यवर्ती भागात पूर, भूस्खलन, शहरी आणि ग्रामीण पाणी तुंबणे आणि भूगर्भीय आपत्तींचा धोका आहे. हवामान बदल आणि पूर नियंत्रणासाठी उच्चस्तरीय देखरेख ठेवण्याची मागणी अधिकाऱ्यांनी केली आहे.