माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावर एफबीआयचा छापा

एफबीआय अधिकाऱ्यांनी पाम बीचवर असलेल्या मार-अ-लागोवर छापा टाकून ते ताब्यात घेतले आहे. एफबीआय राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत कागदपत्रांचा शोध घेत आहे, त्याच अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले.

    वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या फ्लोरिडा (Florida) येथील मार-अ-लागो रिसॉर्टवर (Mar-a-Lago Resort) एफबीआयने (FBI) छापा टाकला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली.

    एफबीआय अधिकाऱ्यांनी पाम बीचवर असलेल्या मार-अ-लागोवर छापा टाकून ते ताब्यात घेतले आहे. एफबीआय राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत कागदपत्रांचा शोध (Search Of Official Documents) घेत आहे, त्याच अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले. फ्लोरिडा येथील ट्रम्प यांच्या पाम बीचवर असलेल्या सुंदर घरावर एफबीआयने छापा टाकून ते अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले. मात्र, तेव्हा ट्रम्प फ्लोरिडामध्ये उपस्थित नव्हते.

    अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी सकाळी ही शोध मोहीम सुरू झाली. अधिकारी ट्रम्प यांचे कार्यालय आणि वैयक्तिक निवासस्थानांवर लक्ष केंद्रित करून शोध घेत आहेत. त्याचवेळी, न्याय विभाग आणि व्हाईट हाऊसने (White House) याप्रकरणी कोणतेही वक्तव्य जारी केले नाही. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात न्याय विभाग दोन प्रकरणांची चौकशी करत आहे.