जगातील सर्वात मोठी गुप्तचर संस्थेच्या रडावर आहे ‘ही’ सुंदर महिला, कारण ऐकून तु्म्हालाही बसेल धक्का!

मुळची बल्गेरियाची असलेली रुजा इग्नाटोवा एफबीआयच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये आहे.

  एकेकाळी क्रिप्टो क्वीन या नावाने ओळखली जाणारी, सुदंरी रुजा इग्नाटोवा आता जगातील सर्वात मोठी गुप्तचर संस्था FBI च्या मोस्ट वॉन्टेड यादीत आहे.
  रुजाने तिच्या क्रिप्टोकरन्सी कंपनी OneCoin च्या माध्यमातून लाखो गुंतवणूकदारांना $4 अब्ज (सुमारे 31,000 कोटी रुपये) चा चूना लावलाय.
  एफबीआयने रुजावर $1 लाख (सुमारे 81 लाख रुपये) बक्षीस ठेवले आहे. जवळपास 6 वर्षांपासून रुजाला पोलीस शोधत आहे.
  2014 मध्ये रुजा इग्नाटोवाने OneCoin नावाची कंपनी सुरू केली. 2019 मध्ये, रुजावर यूएसमध्ये मनी लाँड्रिंग अंतर्गत फसवणुकीचा आरोप करण्यात आला. यानंतर त्याचा मोस्ट वाँटेड यादीत समावेश करण्यात आला.
  आपल्या सौंदर्याने लोकांना मूर्ख बनवणाऱ्या रुजाने प्लास्टिक सर्जरी करून आपली ओळख लपवल्याच बोललं जातं. तर, सशस्त्र रक्षकांची संपूर्ण फौज रुजासोबत असून आता तिने अंडरवर्ल्डसाठी काम करायला सुरुवात केली असल्याच्याही अफवा समोर आल्या आहेत.
  ऑक्टोबर 2017 मध्ये जेव्हा यूएस अधिकाऱ्यांनी रुजाच्या अटकेसाठी वॉरंट जारी केले तेव्हापासून ती गायब झाली असून अद्याप ती पोलिसांना सापडली नाही.