बांग्लादेशचा सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिन, पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत, पाहा VIDEO

बांग्लादेशच्या पन्नासाव्या स्वातंत्र्यदिनाचे प्रमुख अतिथी म्हणून आगमन झालेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. ढाका विमानतळावर मोदींचं जोरदार स्वागत झालं. त्यानंतर स्वातंत्र्यदिनाचा प्रमुख कार्यक्रमासाठी ते रवाना झाले. तोफांच्या सलामीने पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलं. 

    भारताचा शेजारी देश असणारा बांग्लादेश स्वातंत्र्याची ५० वर्षं पूर्ण करत आहे. बांग्लादेशचा आज स्वातंत्र्यदिन आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी या सुवर्ण महोत्सवाचे प्रमुख पाहुणे आहेत. काही वेळापूर्वीच पंतप्रधान मोदींचं बांग्लादेशमध्ये आगमन झालं.

    बांग्लादेशच्या पन्नासाव्या स्वातंत्र्यदिनाचे प्रमुख अतिथी म्हणून आगमन झालेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. ढाका विमानतळावर मोदींचं जोरदार स्वागत झालं. त्यानंतर स्वातंत्र्यदिनाचा प्रमुख कार्यक्रमासाठी ते रवाना झाले. तोफांच्या सलामीने पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलं.

    भारत स्वतंत्र झाल्यानंतर बरोबर २४ वर्षांनी बांगलादेशची निर्मिती झाली. पाकिस्तानपासून बांग्लादेश या स्वतंत्र देशाची स्थापना झाली. बांग्लादेशच्या निर्मितीत भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निर्णयांचा आणि धोरणांचा अत्यंत महत्त्वपूर्ण वाटा होता. पाकिस्तानची विभागणी होऊन बांग्लादेशची निर्मिती झाली. बांग्लादेशाला स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र अशी ओळख मिळाल्याच्या घटनेला आज (शुक्रवार) ५० वर्षं पूर्ण होत आहेत.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण देण्याची कल्पना बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सुचवली आणि पंतप्रधान मोदींकडून त्याला लगेचच होकार देण्यात आला. कोरोना संकटांनंतरचा पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. या दौऱ्यात बांग्लादेशच्या स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन सोहळ्यात पंतप्रधान सहभागी होतीलच, शिवाय भारत आणि बांग्लादेशमधील परस्पर संबंध, व्यापार आणि दळणवळण वाढवण्याच्या दृष्टीने चर्चा देखील करणार आहेत.