fitness freak cat

सुशांत नंदा (Susanta nanda) यांनी आपल्या ट्विटरवर एका मांजरीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मांजर चक्क एक्सरसाइझ (Cat exercise) करताना दिसत आहे. सुशांत यांनी फिटनेस फ्रिक (Fitness freak cat) असं कॅप्शन या व्हिडिओला दिलं आहे.

    मुंबई : आजकाल प्रत्येक जण आपल्या फिटनेसचा(Fitness) विचार करत असतो. आपण फिट राहावं , यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न सुरु असतो. आहार, त्यासाठी लोक रोज मेहनत घेत असतात. सध्या सोशल मीडियावर एका फिटनेस फ्रिक मांजरीचा व्हिडिओ(Fitness Freak Cat Video) व्हायरल होत आहे.

    सुशांत नंदा (Susanta nanda) यांनी आपल्या ट्विटरवर एका मांजरीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मांजर चक्क एक्सरसाइझ (Cat exercise) करताना दिसत आहे. सुशांत यांनी फिटनेस फ्रिक (Fitness freak cat) असं कॅप्शन या व्हिडिओला दिलं आहे.

    मांजरीच्या या व्हिडिओमध्ये रस्त्यावर एक कार उभी असलेली आपल्याला दिसते. कारच्या मागे एका चाकाजवळ एक मांजर जमिनीवर झोपलेलं दिसत आहे. मांजराने गाडीला आपले मागचे दोन्ही पाय लावले आहेत. पोटातून वाकून क्रंच एक्सरसाईज करताना हे मांजर दिसत आहे. व्हिडिओमधील मांजर लठ्ठ आहे. कदाचित त्या मांजरीलाही आपण वजन कमी करावं , असं वाटत असेल म्हणून तिने व्यायाम करायला सुरुवात केली असेल, असे वाटते.