taliban-supercar

तालिबानच्या राजवटीमध्ये पहिल्यांदाच सुपरकार (Taliban Supercar) तयार करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही सुपरकार तयार करण्यासाठी आतापर्यंत 40 ते 50 हजार डॉलर्स खर्च झाला आहे.

    अफगाणिस्तानातून कायम हिंसाचार आणि फतव्याच्या घटना समोर येत असतात. मात्र सध्या अफगाणिस्तान वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आले आहे. अफगाणिस्तानमध्ये एका सुपरकारची (Supercar) चर्चा आहे. सोशल मीडियावर देखील या कारचे फोटो व्हायरल झाले आहे. तालिबान शासित अफगाणिस्तानात इंजिनीअर्सनी पहिल्यांदाच एका सुपरकारचे अनावरण केले आहे. या कारचे नाव MADA-9 असं आहे. ही सुपरकार तयार करण्यासाठी  इंजिनीअरला 5 वर्षांपेक्षा जास्त काळ लागला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ENTOP आणि अफगाणिस्तान टेक्निकल व्होकेशनल इन्स्टिट्यूटच्या (ATVI) किमान 30 इंजिनीअर्सनी एकत्रितपणे ही कार विकसित केली आहे.


    तालिबानच्या राजवटीमध्ये तयार करण्यात आलेली ही पहिली सुपरकार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही सुपरकार तयार करण्यासाठी आतापर्यंत 40 ते 50 हजार डॉलर्स खर्च झाला आहे. ही स्पोर्ट्स कार स्थानिक पातळीवर विकसित केली गेली आहे. सध्या तिच्या कॉन्सेप्ट मॉडेलमध्ये अजून बरंच काम करावं लागणार आहे. एका रिपोर्ट्सनुसार, या सुपरकारमध्ये टोयोटा कोरोलाचे फोर-सिलेंडर, 1.8-लिटर इंजिन वापरण्यात आले आहे. हे इंजिन सुपरकारसारखे पॉवरफुल नसते. मात्र अफगाणिस्तानच्या कार इंजिनीअर्सचे हे मोठे यश असल्याचे सांगितले जाते. या कारचे काही फोटोही इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. लोक अफगाणिस्तानमधील इंजिनीअर्सचं कौतुक करते.

    तालिबानचा उच्च शिक्षण मंत्री अब्दुल बाकी हक्कानी याने स्वतः या कारचे अनावरण केले आहे. अफगाणिस्तानचा संयुक्त राष्ट्र (UN) मधील राजदूत सुहेल शाहीन यानी त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या कारचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, अफगाणच्या तरुणांनी अफगाणिस्तानच्या विकासात त्यांची महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे.