‘युक्रेन युद्धापूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिली होती जीवे मारण्याची धमकी’, इंग्लंडच्या माजी पंतप्रधानांचा खळबळजनक दावा, BBC ची नवी डॉक्युमेंट्रीही वादात ?

डॉक्युमेंट्रीमध्ये बोरिस जॉन्सन म्हणाले की, युक्रेनवरील हल्ल्यापूर्वी मी पुतीन यांना समजवण्याचा प्रयत्न केला होता. पुतीन यांना म्हणालो होतो की, युक्रेन नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) मध्ये सामील होण्याची शक्यता नाही. तुम्हाला हे माहिती आहे. बोरिस यांनी पुतीन यांना इशाराही दिला होता.

    नवी दिल्ली – ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटले आहे की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. बोरिस जॉन्सन 2019 ते ऑक्टोबर 2022 पर्यंत ब्रिटनचे पंतप्रधान होते. पदावर असताना त्यांना ही धमकी मिळाली होती. हा खुलासा बोरिस जॉन्सन यांनी BBCच्या एका नवीन डॉक्युमेंट्रीत केला आहे. ही डॉक्युमेंट्री आज प्रसारित होणार आहे. या डॉक्युमेंट्रीत बोरिस यांनी पुतीन यांच्याशी झालेल्या संभाषणाचा उल्लेख केला आहे. बोरिस म्हणाले- 24 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेनवर हल्ला होण्यापूर्वी मी पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. तेव्हा पुतीन यांनी धमकी दिली आणि म्हणाले- बोरिस, मला तुझे नुकसान करायचे नाही, पण क्षेपणास्त्र हल्ला करून असे करण्यासाठी फक्त एक मिनिट लागेल.

    बोरिस यांनी पुतीन यांना इशाराही दिला होता
    डॉक्युमेंट्रीमध्ये बोरिस जॉन्सन म्हणाले की, युक्रेनवरील हल्ल्यापूर्वी मी पुतीन यांना समजवण्याचा प्रयत्न केला होता. पुतीन यांना म्हणालो होतो की, युक्रेन नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) मध्ये सामील होण्याची शक्यता नाही. तुम्हाला हे माहिती आहे. बोरिस यांनी पुतीन यांना इशाराही दिला होता. जॉन्सन म्हणाले होते – मी पुतीन यांना समजावण्यासोबतच त्यांना इशाराही दिला होता. मी म्हणालो होतो की, युक्रेनवर आक्रमण केल्याने तुमचा थेट सामना नाटोशी होईल. या हल्ल्यामुळे तुम्ही स्वतःला नाटोपासून दूर ठेवू शकणार नाही.

    पुतीन मला फिरवत होते – बोरिस
    डॉक्युमेंट्रीमध्ये जॉन्सन म्हणाला – पुतीन माझे म्हणणे गांभीर्याने ऐकत नव्हते. मला वाटतं पुतीन खूप आरामात बोलत होते, पण ते काही समजून घ्यायला तयार नव्हते. असे वाटले की ते फक्त माझे प्रयत्न आणि माझे बोलणे टाळत आहे किंवा फिरवण्याचा प्रयत्न करत आहे.

    बोरिस जॉन्सन यांच्यावर घातली होती बंदी
    बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान असताना रशियावर अनेक निर्बंध लादले होते. प्रत्युत्तर म्हणून रशियाने ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि परराष्ट्र सचिव लिझ ट्रस यांच्यासह 10 ब्रिटिश मुत्सद्दींवर बंदी घातली होती. हे लोक बंदीअंतर्गत रशियात प्रवेश करू शकत नाहीत.