photo credit - social media
photo credit - social media

जवळपास दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या पाकिस्तानला चीनने पुन्हा एकदा पाठिंबा दिला आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी शुक्रवारी सांगितले की चीनने गेल्या आठवड्यात परिपक्व झालेल्या $ 2 अब्ज कर्ज दिले आहे, ज्यामुळे पाकिस्तानच्या पेमेंट बॅलन्सच्या संकटाला त्वरित दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसापासून पाकिस्तान सतत आर्थिक संकटातून जात (Pakistan Economic Crisis) असून लोकांना दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागतोय. एकतर आधीच   वाढत्या लोक महागाईने (inflation) हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत मोफत धान्य मिळवण्यासाठी लोकांमध्ये अक्षरहा चढाओढ लागली आहे. त्यातच रमजानचा (Ramdan) महिना असल्याने या पार्श्वभूमीवर शाहबाज शरीफ सरकार गरिबांना मोफत पीठ वाटप करत आहे. रविवारी मोफत पिठाचे वाटप सुरू असताना कराचीमध्ये शुक्रवारी रमजान अन्न वितरण केंद्रात झालेल्या चेंगराचेंगरीत महिला आणि मुलांसह किमान 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 29 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये आठ महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे.

 पिठ मोफत वाटलं जात होतं

पाकिस्तानमध्ये महागाईमुळे पिठाची किंमत 160 रुपये किलोवर पोहोचली आहे, त्यामुळे सरकार या केंद्रांद्वारे स्वस्त आणि मोफत पीठ उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे मोफत मिळणारं पिठ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी उसळली. त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली. महत्त्वाचं म्हणजे पोलीसही घटनास्थळी हजर होते, मात्र चेंगराचेंगरी होताच जवान पळून गेले. यापुर्वी पंजाब प्रांतात गेल्या आठवडाभरात सरकारकडून मोफत वाटले जाणारे पीठ घेताना चेंगराचेंगरीच्या काही घटना घडल्या आहेत. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन महिलांचाही समावेश आहे.

नकळत विद्युत तारेवर पाय ठेवला.

मिळालेल्या माहितीनुसार, मोफत पिठ घेताना मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली. यामुळे नकळत कुणीतरी विजेच्या तारेवर पाय ठेवल्यान  जीव वाचवण्यासाठी सगळे पळु लागले त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. यावेळी लोकांनी एकमेकांना ढकलण्यास सुरुवात केली, ज्यामुळे दोन महिला आणि दोन मुले जवळच्या नाल्यात पडली.

पेशावरमध्ये शीख व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या 
पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्यात आले आहे., शुक्रवारी पेशावरमध्ये एका शीख व्यावसायिकाची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, पेशावरच्या डीअर कॉलनी भागात काही मोटरसायकलवरून आलेल्या लोकांनी दयाल सिंग या व्यावसायिकावर गोळीबार केल्याची घटना दुपारी 3 च्या सुमारास घडली. त्यांनी सांगितले की, घटनेनंतर बंदूकधारी घटनास्थळावरून पळून गेले. पेशावरच्या दीर कॉलनी भागात व्यापारी दयाल सिंग यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांनी सांगितले की, घटनेनंतर बंदूकधारी घटनास्थळावरून पळून गेले. पेशावरच्या दीर कॉलनी भागात व्यापारी दयाल सिंग यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांनी सांगितले की, घटनेनंतर बंदूकधारी घटनास्थळावरून पळून गेले.

पोलिसांनी घटनास्थळावरून 30 बोअरचे गोले जप्त केले आहेत. तसेच जवळच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर त्यांनी हल्ल्याचा तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे, कराचीमध्ये एका हिंदू डॉक्टरची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर पेशावरची हत्या झाली.