जर्मन सरकार लॉकडाऊन वाढवण्याचाच्या तयारीत ; कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे चिंता वाढली

मागील काही दिवसापासून जर्मनीमध्ये रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दररोज जर्मनीमध्ये १० हजाराहून अधिक रुग्ण आढळत आहेत. रविवारी ११ हजार १४९ रुग्ण आढळून आले. यादरम्यान ५ हजर ६०० लोकांनी कोरोनावर मात केली असून १२३ लोकांचा यात मृत्यू झालं आहे.

    कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे जर्मनी पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्याच्या तयारीत आहे. संसर्गापासून बचाव करण्यासाठी तयार केलेल्या प्रस्तावाच्या मसुद्यात मागील पाच महिन्याच्या कालावधीत वाढलेल्या कोरोनाच्या आकड्यांची माहितीही देण्यात आली आहे. चान्सलर अँजेला मर्केल यांच्या  कार्यालयात तयार केलेल्या  प्रस्तावात लॉकडाऊन १८ एप्रिलपर्यंत वाढविण्यात यावे असे म्हटले आहे. प्रादेशिक आणि राष्ट्रीय नेत्यांच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेता येणार आहे.

    मागील काही दिवसापासून जर्मनीमध्ये रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दररोज जर्मनीमध्ये १० हजाराहून अधिक रुग्ण आढळत आहेत. रविवारी ११ हजार १४९ रुग्ण आढळून आले. यादरम्यान ५ हजर ६०० लोकांनी कोरोनावर मात केली असून १२३ लोकांचा यात मृत्यू झालं आहे. जर्मनीत आतापर्यंत २६.७० टक्के लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच ७५ हजार २७० लोक मरण पावले आहेत . संसर्ग झालेल्या १ लाख ७९ लोकांवर उपचार सुरु आहेत. एका दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या क्रमवारीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.तर ब्राझील पहिल्या क्रमांकावर असून एका दिवसात ४४,००९ रुग्ण आढळून आले आहेत.