तीला करायचे होते स्वतःच्या मृत्यूचे नाटक, इन्स्टाग्रामवर शोधली स्वत: सारखी दिसणारी मुलगी, आणि मग…

शहरबानने पतीला सांगितले होते की, ती तिच्या आधीच्या पतीला भेटायला जात आहे. बराच वेळ होऊनही ती न परतल्याने तिचे पालक तिला शोधण्यासाठी बाहेर पडले. डॅन्यूब नदीच्या काठावर, त्यांना शाहबरनची कार सापडली, ज्याच्या मागील सीटवर काळ्या केसांच्या महिलेचा मृतदेह होता. हा मृतदेह आपल्या मुलीचा आहे असे त्यांना वाटले.

  नवी दिल्ली – जर्मनीतील एका 23 वर्षीय महिलेने सोशल मीडियावर स्वत: सारखी दिसणारी मुलगी शोधूली आणि ठार मारून स्वतःच्या मृत्यूची बनाव केल्याचा घटना समोर आली आहे. प्रकरणी जर्मन पोलिसांनी तीला ‘द डॉपलगँगर मर्डर’ असे नाव दिले आहे. ही घटना गेल्या वर्षी 16 ऑगस्टला घडली होती, जी आता समोर आली आहे.

  इन्स्टाग्रामवर शोधली स्वत: सारखी दिसणारी मुलगी
  पोलिसांनी सांगितले की, म्युनिक येथे राहणाऱ्या शहाराबान के. नावाच्या महिलेने इंस्टाग्रामवर एक बनावट प्रोफाइल तयार केले आणि तिच्यासारख्या दिसणाऱ्या अनेक महिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रोफाइल शोधल्यानंतर, तिला कॉस्मेटिक ब्लॉगरची प्रोफाइल सापडली.

  खादिदजा नावाचा हा ब्लॉगर अल्जेरियन नागरिक होता आणि आरोपी महिलेच्या घरापासून सुमारे 160 किमी दूर राहत होती. दोघींचेही लांब काळे केस होते आणि रंग जवळपास सारखाच होता. शहरबान आणि तिचा प्रियकर शाकीर के. खादिदजाशी संपर्क साधला आणि तिला काही सौंदर्य उत्पादने ऑफर केली. यानंतर दोघेही तीला घेण्यासाठी आले. खादिदजासोबत म्युनिकला परतत असताना दोघांनी जंगलात कार थांबवली आणि खादिदजा हिच्यावर 50 वार केले, असे पोलिसांनी सांगितले.

  शवविच्छेदन आणि डीएनए चाचणीत सत्य समोर आले सत्य
  शहरबानने पतीला सांगितले होते की, ती तिच्या आधीच्या पतीला भेटायला जात आहे. बराच वेळ होऊनही ती न परतल्याने तिचे पालक तिला शोधण्यासाठी बाहेर पडले. डॅन्यूब नदीच्या काठावर, त्यांना शाहबरनची कार सापडली, ज्याच्या मागील सीटवर काळ्या केसांच्या महिलेचा मृतदेह होता. हा मृतदेह आपल्या मुलीचा आहे असे त्यांना वाटले.

  पोलिसांनी सांगितले की त्यांना गुन्ह्याच्या ठिकाणाजवळ अनेक चाकू सापडले आणि शाकीरच्या फ्लॅटजवळ कार पार्क केलेली आढळली. शवविच्छेदन आणि डीएनए चाचणीच्या अहवालात हा मृतदेह शाहराबानचा नसून खदिजाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी शहाराबान आणि शाकीर यांना तपासानंतर अटक केली. पोलिसांचे म्हणणे आहे की आरोपी महिलेला कौटुंबिक कलहामुळे गायब व्हायचे होते, म्हणून तिने स्वत: चा मृत्यू ओढवून घेतला आणि यासाठी तिने आपल्यासारखे दिसणारे शोधून तिची हत्या केली.