ghost restaurant in spain

हे एक रेस्टॉरेंट आहे. येथे जाण्यासाठी वाघाची छाती हवी. कारण येथे भुतेच स्वागताला असतात, रक्ताळलेला सुरा अथवा तलवार घेऊन भयानक चेहऱ्याने ती तुमची मान पकडतात आणि काय खाणार असे विचारतात. जगात अनेक प्रकारची रेस्टॉरेंट आहेत पण असे रेस्टॉरंट कुठे नसेल. भुतांच्या स्वागतानंतर न घाबरता धीटपणे तुम्ही ऑर्डर दिलीत तरी आलेला पदार्थ खाताना थरथर कापावे असे वातावरण येथे आहे. स्पेन मध्ये ला मासिया एकांटडा नावाच्या या रेस्टॉरंट मध्ये मुळातच हृदय कमजोर असलेले, दम्याचे पेशंट, गर्भवती महिला आणि 14 वर्षाखालील मुलांना प्रवेशच नाही. अपंग लोकांनाही येथे प्रवेश दिला जात नाही आणि फोन व कॅमेरा आत घेऊन जाता येत नाही.

    कुणी उघडपणे कबुल करत नसले तरी बहुतेक लोक भूताखेताना घाबरतात. भुते असतात का हा वादाचा विषय असेल पण कुठल्या पडक्या जागी, रात्री बेरात्री पैज लावली तरी बहुतेक कुणी जाण्यास होकार देत नाही. भुते कुठेही असतात पण शक्यतो पडक्या, ओसाड जागा, विहारी, वाडे, झाडे येथे नक्की असतात असा समज आहे. जे लोक भुतांना घाबरत नाहीत त्यांच्यासाठी एक अजब ठिकाण स्पेनमध्ये आहे.

    हे एक रेस्टॉरेंट आहे. येथे जाण्यासाठी वाघाची छाती हवी. कारण येथे भुतेच स्वागताला असतात, रक्ताळलेला सुरा अथवा तलवार घेऊन भयानक चेहऱ्याने ती तुमची मान पकडतात आणि काय खाणार असे विचारतात. जगात अनेक प्रकारची रेस्टॉरेंट आहेत पण असे रेस्टॉरंट कुठे नसेल. भुतांच्या स्वागतानंतर न घाबरता धीटपणे तुम्ही ऑर्डर दिलीत तरी आलेला पदार्थ खाताना थरथर कापावे असे वातावरण येथे आहे. स्पेन मध्ये ला मासिया एकांटडा नावाच्या या रेस्टॉरंट मध्ये मुळातच हृदय कमजोर असलेले, दम्याचे पेशंट, गर्भवती महिला आणि 14 वर्षाखालील मुलांना प्रवेशच नाही. अपंग लोकांनाही येथे प्रवेश दिला जात नाही आणि फोन व कॅमेरा आत घेऊन जाता येत नाही.

    येथे ग्राहकांचे मनोरंजन केले जाते तेही भूतेच करतात. जेवणाच्या मध्ये एक शो दाखविला जातो तो भीतीने रक्त गोठावे इतका भयानक असतो. येणारा ग्राहक घाबरवा असाच येथे प्रयत्न केला जातो. हे रेस्टॉरंट सुरु झाले त्याला चाळीस वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. येथे प्रत्यक्षात भुते नाहीत. येथे वेटरचा भुताचे पोशाख करतात. येथे दिवसातले फक्त तीन तास जेवण सर्व केले जाते. 60 लोक बसू शकतील अशी व्यवस्था येथे आहे पण अगोदर बुकिंग केल्याशिवाय येथे जाता येत नाही. आत प्रवेश केल्यापासून येथील भुते कोणती करामत कधी करतील याचा अंदाजच येत नाही त्यामुळे पूर्णवेळ अगदी धीट ग्राहक सुद्धा मनातून थोडे घाबरलेले असतात असा अनुभव सांगितला जातो.

    हे सुद्धा वाचा