कधीकाळी अत्यंत सुंदर दिसणाऱ्या मुलीना पाहून लोक आता घाबरुन जातात! 8 वर्षांत 100 हून अधिक शस्त्रक्रिया मुलगी झाली एलियन

सुंदर दिसण्याकरिता लोक काय काय करत नाहीत? कॉस्मेटिक्स सर्जरीपासून बोटोक्स इंजेक्शनची मदत घेतात. परंतु एका मुलीच्या डोक्यात एलियन (परग्रहवासी) होण्याचे भूत शिरले आहे. हे ऐकण्यास विचित्र वाटत असले तरीही हेच सत्य आहे. एलियनसारखा लुक मिळविण्यासाठी विनी ओहने शरीरावर अनेक प्रकारच्या प्लास्टिक सर्जरीद्वारे स्वतःचा पूर्ण लुकच बदलला आहे. कधीकाळी अत्यंत सुंदर दिसणाऱ्या विनीला पाहून आता लोक घाबरूनच जातील(More than 100 surgeries in 8 years the girl became an alien).

  परग्रहवासीयांसारखी दिसण्याची धडपड

  विनी ओहला अन्य ग्रहांवर राहणाऱ्यांबद्दल प्रचंड उत्सुकता होती. याचमुळे ती त्यांच्यासारखे स्वतःला रूप प्राप्त करून देण्यासाठी झटू लागली. सोशल मीडियाच्या जगतात तिचा हा ध्यास चर्चेचा विषय ठरला आहे. विनी ओहवर ‘रियल लाइफ एलियन’ होण्याचे भूत स्वार झाल्याने ती आता खूपच वेगळी दिसू लागली आहे.

  लाखोंचा खर्च

  अमेरिकेच्या लॉस एंजिलिस येथे राहणारी 26 वर्षीय विनी अशा लुक मिळविण्यासाठी 100 हून अधिक शस्त्रक्रियांना सामोरी गेली आहे. या शस्त्रक्रियांवर तिने लाखो रुपये खर्च केले आहेत. यामुळे तिचा पूर्ण चेहरा बदलून गेला आहे. सातत्याने बॉडी ट्रीटमेंटमुळे आता विनीला ओळखणेही अवघड झाले आहे. विनीने वयाच्या 17 व्या वर्षी पहिली शस्त्रक्रिया करवून घेतली होती. तिने स्वतःच्या ओठांवर फिलर्स लावून घेत त्यांचा पूर्ण आकारच बदलला आहे. विनी सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिची फॅन फॉलोइंग मोठ्या प्रमाणावर आहे.

  हे सुद्धा वाचा
  • 2022