
त्याने आरोप केला की, डिनर पार्टीच्या दिवशी त्याच्या महिला बॉसने त्याला पकडलं. “तुला आशियाई स्त्रिया आवडतात, हे मला माहीत आहे,” असं म्हणत तिने लैंगिक संबंधासाठी विचारणा केली. पण वरिष्ठ महिला अधिकाऱ्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास आपण नकार दिला.
नवी दिल्ली – मागील काही दिवसांपासून माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जगप्रसिद्ध कंपनी गूगल विविध कारणांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या कंपनीने अलीकडेच हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं आहे. दरम्यान, एका माजी अधिकाऱ्यांने गूगलच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. कार्यलयाच्या डिनर पार्टीत महिला अधिकाऱ्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने आपल्याला नोकरीवरून काढलं, असा खळबळजनक दावा गुगलच्या माजी अधिकाऱ्याने केला. याबाबतचं वृत्त ‘इनशॉर्ट’ने दिलं आहे.
काय आहे कर्मचाऱ्याचा दावा
संबंधित माजी कर्मचाऱ्याने दावा केला की, गूगल कंपनीतील वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने दिलेली लैंगिक सुखाची ऑफर नाकारल्याने आपल्याला नोकरीवरून काढलं. कार्यालयाच्या डिनर पार्टीच्या दिवशी हा प्रकार घडला. त्याने आरोप केला की, डिनर पार्टीच्या दिवशी त्याच्या महिला बॉसने त्याला पकडलं. “तुला आशियाई स्त्रिया आवडतात, हे मला माहीत आहे,” असं म्हणत तिने लैंगिक संबंधासाठी विचारणा केली. पण वरिष्ठ महिला अधिकाऱ्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास आपण नकार दिला. यामुळे आपल्याला नोकरीवरून काढलं, असा आरोप संबंधित अधिकाऱ्याने केला. संबंधित कनिष्ठ पुरुष अधिकारी मागील १६ वर्षांपासून Google कंपनीत काम करत होता.
तक्रार करूनही कारवाई नाही
न्यू यॉर्क पोस्टनुसार, सात मुलांचे वडील ओलोहान म्हणतात की त्यांना सुरुवातीला ही घटना लोकांसमोर आणताना अस्वस्थता वाटली कारण त्यांचे बहुतेक सहकारी त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत होते. गुगलच्या एचआर विभागावर तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ते म्हणाले की एचआरने उघडपणे कबूल केले आहे की जर तक्रार उलट असेल, म्हणजे एखाद्या महिलेने एखाद्या पुरुषावर छेडछाड केल्याचा आरोप केला असेल तर त्वरित कारवाई केली गेली असती.
‘