अबब! ‘इतके’ तास काम करतात भारतीय लोकं ; इतर देशांच्या तुलनेत कामाचे तास ऐकून सर्वांनाच बसेल धक्का

आइसलँड, स्पेन आणि न्यूझीलंडमधील अनेक कंपन्यांनी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे आठवड्यात ४ दिवस काम करण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत, दर आठवड्याला ३५ ते ३६ तास म्हणजे प्रतिदिन ९ तासांप्रमाणे काम करण्याचे नियम बनवले गेले होते. इतर देशांमध्ये कामाचे तास कमी करण्यात येत आहेत मात्र भारतात चित्र वेगळे आहे.

    १९७० मध्ये भारतीय आठवड्यात ३९ तास काम करत होते तर आता भारतीय ४५ तास काम करतात. विशेष आणि धक्कादायक बाब म्हणजे मुंबई-दिल्ली येथील कामगार ६० तास काम करतात तर यूएस-यूकेतील कर्मचारी केवळ ३३-३४ तासांपेक्षा कमीच काम करतात.(Indians Works 40-60 Hours and US UK labour works Less Than 33-34 Hours)

    कामाचे तास मोजण्याचे ‘हे’ ठरले निमित्त
    क्रीडासाहित्य कंपनी नाइकीने सप्टेंबरचा पहिला आठवडा मानसिक आरोग्य विश्रांती म्हणून साजरा केला. त्यांनी जगभरातील कर्मचाऱ्यांना पूर्ण आठवड्याची सुट्टी दिली. त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगितले की जेव्हा तुम्ही पूर्ण आठवड्याच्या सुट्टीनंतर परताल तेव्हा आठवड्यातून फक्त ३ दिवसच ऑफिसला या.कंपनीची कार्यालये आठवड्यातून ५ दिवस काम करतील, परंतु कर्मचारी फक्त ३ दिवस कार्यालयात येतील, उर्वरित २ दिवस ते योग्य वाटतील तेथून काम करतील. यापूर्वी, २०१५ ते २०१९ दरम्यान, आइसलँडिक परिषदेने आपल्या २५०० कर्मचाऱ्यांना आठवड्यातून फक्त ४ दिवस काम करण्यासाठी सांगितले. त्याचा फायदा असा झाला की कौन्सिलने या वर्षी जुलैमध्ये एक अहवाल सादर करत सांगितले की त्या पाच वर्षांमध्ये प्रचंड नफा झाला.

    यानंतर, आइसलँड, स्पेन आणि न्यूझीलंडमधील अनेक कंपन्यांनी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे आठवड्यात ४ दिवस काम करण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत, दर आठवड्याला ३५ ते ३६ तास म्हणजे प्रतिदिन ९ तासांप्रमाणे काम करण्याचे नियम बनवले गेले होते. इतर देशांमध्ये कामाचे तास कमी करण्यात येत आहेत मात्र भारतात चित्र वेगळे आहे. भारतात १९७० मध्ये नागरिकांनी वर्षभरात २०७७ तास म्हणजे आठवड्यातून सुमारे ३९ तास काम करायचे, परंतु आता त्यांना सुमारे ४५ ते ६० तास काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे.