गुटेरेस म्हणाले; दर 11 मिनिटांनी होत आहे जोडीदार किंवा कुटुंबातील सदस्याकडून एका महिलेची किंवा मुलीची हत्या

    दिल्लीतील श्रध्दा वालकर हत्ये प्रकरणी संपूर्ण देश हदरून गेला असताना, संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी सांगितले की, जगात दर 11 मिनिटांनी एका मुलीची किंवा महिलेची हत्या होत आहे. ही हत्या महिलेच्या किंवा मुलीच्या जवळच्या व्यक्तीने केली आहे. तसेच महिलांवरील हिंसाचार हे जगातील सर्वात मोठे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे.

    त्याबरोबरच 25 नोव्हेंबर रोजी साजरा होणारा ‘महिलांवरील हिंसाचार निर्मूलन’ या आंतरराष्ट्रीय दिनापूर्वी गुटेरेस यांच्या कडून हे सांगण्यात आले आहे. दिल्लीतील श्रद्धा वॉकरच्या हत्येच्या घटनेने संपूर्ण देश हादरला असताना अँटोनियो गुटेरेस यांचे वक्तव्य समोर आले आहे. श्रद्धा खून प्रकरणाचे गूढ उकलण्यामध्ये पोलिसांच्या हाती काही महत्वाचे धागेदोरे लागले आहेत. तरी, पोलिसांना अद्याप असा कोणताही पुरावा मिळालेला नाही, ज्यामुळे श्रद्धाच्या हत्येचे रहस्य उलगडू शकेल.

    युएनचे सरचिटणीस या मागील कारण देखील सांगण्याचा प्रयत्न केला आहे, स्त्रिया आणि मुलींना ऑनलाइन मोठ्या प्रमाणावर हिंसाचाराचा सामना करावा लागतो, ज्यामध्ये दिशाभूल करणाऱ्या द्वेषयुक्त शब्दांपासून लैंगिक छळ, प्रतिमेचा गैरवापर होतो. तसेच या गोष्टीमुळे भेदभाव, हिंसा आणि अत्याचाराची मोठी किंमत चुकवावी लागली आहे. ही गोष्ट संपूर्ण महिला वर्गाला लागू होते, त्यामपळे त्यांचे मूलभूत अधिकार हिरावून घेण्याच प्रयत्न केल जातो.