२०२० मध्ये या यूट्यूबरची सर्वाधिक कमाई, चिमुकल्याची कोटीच्या कोटी उड्डाणे

कोरोना संकटाच्या काळात सर्वांवर आर्थिक संकट आलं असताना एका नऊ वर्षाच्या मुलानं मात्र कमाल केलीय. गेल्या वर्षभरात त्यानं यूट्यूबच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई केलीय. त्याची कमाई हा तर आश्चर्याचा भाग आहेच. मात्र त्यापेक्षा ज्या वयात त्यानं हे यश मिळवलंय, तो सर्वाच्या कौतुकाचा मुद्दा ठरतोय.

रयान काजी हा या वर्षी यूट्यूबमधून सर्वाधिक कमाई करणारा मुलगा ठरलाय. रयान आहे केवळ ९ वर्षांचा. मात्र गेल्या वर्षभरात रयाननं यूट्यूबच्या माध्यमातून सुमारे ४ हजार कोटींपेक्षा जास्त पैसे कमावलेत.

कोरोना संकटाच्या काळात सर्वांवर आर्थिक संकट आलं असताना एका नऊ वर्षाच्या मुलानं मात्र कमाल केलीय. गेल्या वर्षभरात त्यानं यूट्यूबच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई केलीय. त्याची कमाई हा तर आश्चर्याचा भाग आहेच. मात्र त्यापेक्षा ज्या वयात त्यानं हे यश मिळवलंय, तो सर्वाच्या कौतुकाचा मुद्दा ठरतोय.

रयान काजी हा केवळ ९ वर्षांचा असून त्याचं जणू आपल्या पूर्ण आयुष्यभर पुरतील, एवढे पैसे एकाच वर्षात कमावून ठेवले आहेत. या वर्षात त्याची आतापर्यंत झालेली कमाई आहे ५३० मिलियन डॉलर. याची भारतीय रुपयांमध्ये किंमत होते साधारण ३ हजार ९०७ कोटी रुपये.

खेळणी बॉक्समधून बाहेर काढण्याचे व्हिडिओ तयार करून त्यानं ही कमाई केलीय. रयान हा खेळण्यांविषयी त्याची मतं त्याच्या चॅनेलवरून देत असतो. रयान काजी हा सध्या अमेरिकेतील टेक्सास प्रांतात राहत असून Ryan’s World या नावाने तो हे चॅनल चालवतो.