ब्रिटनमधील हिंदू मंदिराची पाकिस्तानींकडून तोडफोड; सरकारी आणि खासगी संपत्तीचे नुकसान

पाकिस्तानी नागरिकांनी मंदिरातील ध्वजाला आग लावली. हे वृत्त बाहेर पसरताच हिंदू रस्त्यावर उतरले. तसेच, लेस्टरच्या काही भागांतून भारत-पाकिस्तानच्या तरुणांमध्ये वाद झाले. मात्र, हल्लेखोरांबाबत अधिकृत कोणतीही माहिती नाही. पाकिस्तानी तरुण गटागटाने रस्त्यावर उतरले. स्थानिक प्रशासन दोन्ही समुदायांच्या लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करीत आहेत.

    लंडन : भारत-पाकिस्तान यांच्यात आशिया चषक क्रिकेटचा (Asia Trophy) टी-२० सामना २८ ऑगस्ट रोजी दुबईत (Dubai) खेळला गेला होता. यावरून आता ब्रिटनमध्ये हिंसाचार (Violence In Britain) उसळला आहे. २८ ऑगस्ट रोजी झालेल्या हिंसक घटना अद्याप सुरूच आहेत. लंडनपासून (London) १०० मैल अंतरावरील लेस्टर शहरातील एका मंदिरात तोडफोडीची (Temple Vandalism) घटना झाल्यामुळे नव्याने तणाव निर्माण झाला आहे.

    पाकिस्तानी नागरिकांनी मंदिरातील ध्वजाला आग लावली. हे वृत्त बाहेर पसरताच हिंदू रस्त्यावर उतरले. तसेच, लेस्टरच्या काही भागांतून भारत-पाकिस्तानच्या तरुणांमध्ये वाद झाले. मात्र, हल्लेखोरांबाबत अधिकृत कोणतीही माहिती नाही. पाकिस्तानी तरुण गटागटाने रस्त्यावर उतरले. स्थानिक प्रशासन दोन्ही समुदायांच्या लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करीत आहेत.

    भारतीय उच्चायुक्ताने ब्रिटिश सरकारसमोर आक्षेप व्यक्त करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, लंडन आणि लेस्टरच्या स्थानिक प्रशासन दोन्ही पक्षांच्या प्रमुख लोकांना हिंसाचार रोखण्यासाठी बैठका घेत आहेत. हे प्रकरण लवकर शांत न झाल्यास मोठी समस्या उद्‌भवू शकते, असे ब्रिटिश सरकारला वाटते. कारण, ब्रिटनमध्ये १४ लाख भारतीय आणि ४.५ लाख पाकिस्तानी राहत आहेत. यामध्ये २७ जणांना अटक केली आहे.

    मंदिरावरील हल्ल्यानंतर हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या. सरकारी आणि खासगी संपत्तीचे नुकसान झाले. मंदिरावर हल्ला करणाऱ्यांचा आम्ही शोध घेत आहोत. दोन्ही पक्षांचे लोक रस्त्यावर उतरत आहेत. ही स्थिती पाहता प्रकरण शांत व्हायला अनेक दिवस लागू शकतात, असे पोलिसांनी सांगितले.