homeless man reuinted with family after they recognise him in photo barber done amazing job

एलेसेंड्रो लोबो नावाचा एक व्यावसायिक पुरुष फॅशन स्टोअर आणि केश कर्तनालयाचा मालक आहे - त्यांनी एका भिकारी व्यक्तीला विचारले की, भुकेला आहे का त्याला काही खायला पाहिजे आहे का ? असे विचारले असता जोआओ यांनी त्यांना नकार दिला.

ब्राझीलमधील एक बेघर व्यक्ती गेल्या १० वर्षांपासून रस्त्यावर राहत होता. परंतु नुकत्याच व्हायरल झालेल्या फोटोमुळे त्याला कुटुंबीयांनी ओळखले आहे. ब्राझीलचा रहिवासी जोआओ कोल्हो ग्वामारेस १० दशकाहून अधिक काळ बेपत्ता होता, परंतु अलीकडेच, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका चित्राबद्दल त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आभार मानले आहेत.

एलेसेंड्रो लोबो नावाचा एक व्यावसायिक पुरुष फॅशन स्टोअर आणि केश कर्तनालयाचा मालक आहे – त्यांनी एका भिकारी व्यक्तीला विचारले की, भुकेला आहे का त्याला काही खायला पाहिजे आहे का ? असे विचारले असता जोआओ यांनी त्यांना नकार दिला. जोआओ भीक मागून आपला उदरनिर्वाह करत होते. इतकंच नाही तर केस कापायलाही विरोध दर्शवला. तरीसुद्धा एलेसेंड्रो लोबो यांनी एक पाऊल पुढे टाकत त्यांची दाढी, केस, मिशा कापून त्यांना आकार दिला

तसेच त्याला लोबो यांनी तीन शर्ट, ट्राऊजरची जोडी, एक जाकीट आणि नवीन जोडी दिले. मदत केल्यावर, लोबोला जोआओ यांच्यामधील तीव्र बदल दर्शविण्यासाठी फोटो काढायचे होते आणि इतर उद्योजकांना गरजूंना मदत करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सोशल मीडियावर छायाचित्र पोस्ट करणे आवश्यक होते. असे त्यांनी सांगितले. यानंतर जोआओ यांचे फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले. हे फोटो जोआओ यांच्या कुटुंबीयांनी पाहिले असता त्यांना सुखद धक्का बसला. तब्बल १० वर्षांनी बेपत्ता असलेल्या जोआओ यांची ओळख कुटुंबीयांनी पटली आहे.

मागील १० वर्षांपासून बेपत्ता असलेले जोआओंचा मृत्यू झाला असावा असे कुटुंबीयांनी गृहीत धरले होते. परंतु त्यांचा फोटो पाहिल्यावर कुटुंबीयांना विश्वास बसला की ते जिवंत आणि सुदृढ आहेत. त्यांची आई आणि बहिणीने तात्काळ केशकर्तनालयाच्या मालकासी संवाद साधला. आणि जोआओ यांच्या शोधात ते बाहेर पडले आहेत. जोआओ यांचा लवकरच शोध घेऊ असे लोबो यांनी म्हटले आहे.

लोबो म्हणतात की जोआओ हे फार लाजाळू व्यक्ती आहेत. परंतु त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले आणि मदतीबद्दल कृतज्ञताही दिसल्याचे लोबो यांनी म्हटले आहे.