चीनमध्ये हॉटेलला भीषण आग; 17 जणांचा मृत्यू, 3 जण जखमी

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्य सुरू केले. स्थानिकांच्या मदतीे जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, आग कशी लागली याचं कारण अद्याप कळु शकलेलं नाही.

    चीन : चीनमधील मध्ये चांगचुन शहरात एका हॅाटेलला आग लागल्याची घटना घडली आहे.  या आगीत तब्बल 17 जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

    ईशान्य चीनमधील चांगचुन शहरात ही घटना  घडल्याचं सांगण्यात येत आहे. येथील एका  हॅाटेलला दुपारी 12:40 वाजताच्या सुमारास आग लागली.  या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्य सुरू केले. स्थानिकांच्या मदतीे  जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, आग कशी लागली याचं कारण अद्याप कळु शकलेलं नाही.