How to detach the head? Murder training is given to children in Pakistan

पाकिस्तानातील क्रूर ईश्वरनिंदा कायद्याची सध्या जगभरात सुरू आहे. एका श्रीलंकन नागरिकाच्या ईश्वर निंदेच्या आरोपाखाली नुकत्याच झालेल्या हत्येने जगभरात खळबळ माजली आहे. हजारो लोकांनी लाथा-बुक्क्या आणि हाती येईल त्या वस्तूने त्या नागरिकाची अमानुषपणे हत्या केली. त्यानंतर रस्त्यावरच त्या व्यक्तीचा मृतदेह जाळून टाकण्यात आला. या घटनेनंतर इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जगभरातून टीका होत आहे. अशावेळी पाकिस्तानातील अजून एक व्हीडिओ समोर आलाय. या व्हीडिओतून ईश्वरनिंदा प्रकरणी पाकिस्तानचा हिंसक आणि अराजक चेहरा जगासमोर आला आहे. हा व्हीडिओ इस्लामाबादेतील लाल मस्जिदचा असल्याचे सांगितले जात आहे(How to detach the head? Murder training is given to children in Pakistan).

    इस्लामाबाद : पाकिस्तानातील क्रूर ईश्वरनिंदा कायद्याची सध्या जगभरात सुरू आहे. एका श्रीलंकन नागरिकाच्या ईश्वर निंदेच्या आरोपाखाली नुकत्याच झालेल्या हत्येने जगभरात खळबळ माजली आहे. हजारो लोकांनी लाथा-बुक्क्या आणि हाती येईल त्या वस्तूने त्या नागरिकाची अमानुषपणे हत्या केली. त्यानंतर रस्त्यावरच त्या व्यक्तीचा मृतदेह जाळून टाकण्यात आला. या घटनेनंतर इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जगभरातून टीका होत आहे. अशावेळी पाकिस्तानातील अजून एक व्हीडिओ समोर आलाय. या व्हीडिओतून ईश्वरनिंदा प्रकरणी पाकिस्तानचा हिंसक आणि अराजक चेहरा जगासमोर आला आहे. हा व्हीडिओ इस्लामाबादेतील लाल मस्जिदचा असल्याचे सांगितले जात आहे(How to detach the head? Murder training is given to children in Pakistan).

    तहरीक-ए-लब्बैकची योजना

    व्हायरल होत असलेल्या या व्हीडिओमध्ये पाहायला मिळत आहे की, जर कुणी धर्माचा अपमान करतो तर त्याचा शीर धडावेगळं केले पाहिजे, असे विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे. या व्हीडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये कट्टरपंधी तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तानचा नारा लाऊडस्पीकरवर ऐकायला मिळत आहे. अशाच प्रकारचा नारा श्रीलंकन नागरिक प्रियंता कुमारा दियावदाना यांची अमानुषपणे हत्या केली जात होती आणि त्यांचा मृतदेह भररस्त्यात पेटवून दिला जात होता त्यावेळी देण्यात येत होता. दरम्यान, पाकिस्तान सरकार आणि टीएलपीमध्ये नुकताच शांतता करार झाला होता. या करारापूर्वी पाकिस्तानमध्ये टीएलपीच्या कार्यकर्त्यांनी उच्छाद मांडला होता.

    पाक सरकारची ‘कामयाब जवान’ योजना

    पाकिस्तानातील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते गुल बुखारी यांनी हा व्हीडिओ ट्वीट केला आहे. इस्लामाबादच्या लाल मस्जिदमधील विद्यार्थ्यांना ईश्वरनिंदा करणाऱ्या आरोपीचं शीर धडावेगळं करण्याची ट्रेनिंग दिली जात आहे. पाकिस्तानचा ‘कामयाब जवान’ (सक्सेसफुल यूथ) प्रोजेक्ट चांगल्याप्रकारे पुढे जात आहे. या व्हिडीओ शेकडो विद्यार्थिनी आणि महिला धार्मिक पेहरावात पाहायला मिळत आहे. या विद्यार्थिनींसोबत महिला पुतळ्याचे शीर कापताना दिसत आहेत. ‘कामयाब जवान’ पाकिस्तान सरकारची एक योजना आहे. ही योजना युवकांसाठी शिक्षण, रोजगाराला चालना देण्यासाठी आखण्यात आल्याचे सांगितले जाते.