ट्विटर,फेसबुक, अॅमेझॉन नंतर आता HP कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार

HP ची जगातील कर्मचाऱ्यांची संख्या 61,000 च्या घरात आहे. पुढील तीन वर्षांत यापैकी सुमारे 10% कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येईल.

  ट्विटरने कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केल्यानंतर जगभरातील कंपन्याही या निर्णयाच अनुकरण करत असल्याचं दिसत आहे. मेटा म्हणजेच फेसबुक, अॅमेझॉन नंतर आता एक मोठी कंपनीदेखील या ट्रेंडमध्ये सामिल झाली आहे. कॅाम्पुटर म्हण्लंट की सगळ्यात आधी आठवणारी कपंनी म्हणजे HP ने ही आता कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  पर्सनल कॉम्प्युटरच्या घटत्या मागणीमुळे महसूल कमी झाल्याने हेवलेट-पॅकार्ड कंपनी म्हणजेच एचपी पुढील तीन वर्षांत 6,000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

  आतापर्यंत ‘या’ कंपन्यानी केलीये कर्मचारी कपात

  आतापर्यंत Meta आणि Amazon ने सुमारे 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरने कंपनीतील निम्म्याहून अधिक लोकांना
  बाहेरचा रस्ता दाखवला आहे. Cisco Systems Inc ने गेल्या आठवड्यात नोकऱ्या आणि कार्यालयांची संख्या कमी करण्याबाबतची माहिती दिली. तर,  हार्ड ड्राइव्ह निर्माता सीगेट टेक्नॉलॉजी होल्डिंग्स पीएलसीने जवळपास 3,000 कर्माचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे.

  HP कडून 10% कर्मचारी कपात

  एचपी कंपनीचे सीईओ एनरिक लॉरेस यांनी दिलेल्या माहितीनुसार,  HP ची जगातील कर्मचाऱ्यांची संख्या 61,000 च्या घरात आहे. पुढील तीन वर्षांत यापैकी सुमारे 10% कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येईल.