चक्रीवादळांचा अमेरिकातील विमान सेवेवर मोठा परिणाम

शुक्रवारी सहा हजारपेक्षा अधिक उड्डाणं रद्द केली गेली आहेत. हवामान अत्यंत खराब असून एकतर त्यांना रद्द करावे लागले किंवा त्यांनी उशिराने उड्डाण केले. तर, गुरुवारी १७०० पेक्षा अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली होती, तर ८८०० पेक्षा अधिक उड्डाणं उशिराने झाली होती.

    अमेरिकेत (USA) आलेल्या भीषण वादळामुळे (Hurricane) हवाई सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. वारंवार येणाऱ्या वादळांमुळे अनेक शहरांतील उड्डाणं रद्द (Flight Canceled) करावी लागली आहेत. तर, खराब हवामानामुळे (Bad Weather) सलग दुसऱ्या दिवशी हजारो उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.

    फ्लाईटअवेअरच्या (FlightAware) मते, शुक्रवारी सहा हजारपेक्षा अधिक उड्डाणं रद्द केली गेली आहेत. हवामान अत्यंत खराब असून एकतर त्यांना रद्द करावे लागले किंवा त्यांनी उशिराने उड्डाण केले. तर, गुरुवारी १७०० पेक्षा अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली होती, तर ८८०० पेक्षा अधिक उड्डाणं उशिराने झाली होती. अमेरिकेत मिसीसिपी ते व्हर्जिनियापर्यंत चक्रीवादळे येत आहेत. त्यामुळे अटलांटा, शेर्लोट, वॉशिंग्टन, डीसी आणि न्यूयॉर्क येथील विमानतळांवर विमानांची गर्दी झाली आहे. दरम्यान, कोविड-१९चा (covid 19) पुन्हा प्रसार झाल्यामुळे मोठ्या संख्येने एअरलाइन्स कर्मचारीही गैरहजर (Absent) आहेत.

    एअरलाइन्सने गुरुवारी अमेरिकेतील १५०० हून अधिक उड्डाणं रद्द केली होती. न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर एक तृतीयांशपेक्षा जास्त उड्डाणं प्रभावित झाली आहेत. न्यू जर्सीजवळील नेवार्क लिबर्टी विमानतळावर एक चतुर्थांशहून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. तर, काही आठवड्यांपूर्वी एअरलाइन्सनं मेमोरियल डे वीकेंडच्या आसपास पाच दिवसांच्या कालावधीत सुमारे २८०० उड्डाणं रद्द केली होती.