बायकोची ‘ती’ एक सवय नवऱ्याला खटकली अन् त्याची मग सटकली, पत्नी आणि सासूची केली हत्या

इशाक आपली पत्नी रेश्मा हिच्यावर विना परवानगी घराबाहेर पडणं, TikTokवर व्हिडिओ(Dispute After Making TikTok Video) अपलोड करणं आणि लोकांसोबत फोनवर बोलणं या गोष्टींमुळे नाराज होता. याच कारणावरुन त्याचं आपल्याय सासूसोबतही दोन-तीन वेळा भांडण झालं होतं.

    कराची : एका महिलेला टीकटॉक व्हिडिओ(TikTok Video) बनवणं महागात पडलं आहे. तिला व्हिडिओमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. महिलेच्या पतीनेच तिची हत्या केली आहे. इतकंच नाही तर या आरोपीनं आपल्या सासूचीसुद्धा निर्घृणपणे हत्या(Murder In Karachi) केली आहे. ही घटना पाकिस्तानच्या (Pakistan) कराचीमधील (Karachi) लांडी परिसरातील शेरपाओ कॉलनीत रविवारी घडली आहे. इशाक असं या घटनेतील आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून घेतला आहे.

    कायदाबाद पोलीस ठाण्याचे एसएचओ गौस बख्श यांनी सांगितलं की, इशाक आपली पत्नी रेश्मा हिच्यावर विना परवानगी घराबाहेर पडणं, TikTokवर व्हिडिओ अपलोड करणं आणि लोकांसोबत फोनवर बोलणं या गोष्टींमुळे नाराज होता. याच कारणावरुन त्याचं आपल्याय सासूसोबतही दोन-तीन वेळा भांडण झालं होतं.
    रेश्माला TikTok वर व्हिडिओ अपलोड करण्याची आवड होती. त्यामुळे, नवऱ्यानं अनेकदा विरोध करूनही ती व्हिडिओ अपलोड करत असत. याच कारणावरुन दोघांमध्ये एकदा वादही झाला होता. वैतागून रेश्मा आपल्या माहेरी निघून गेली होती.

    असा आरोप आहे, की रविवारी इशाक तिच्या माहेरी पोहोचला आणि आपली पत्नीसोबतच सासूवरही गोळ्या झाडल्या. या घटनेत दोघींचाही जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी याविरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे. या घटनेनंतर इशार फरार झाला आहे आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत.