If the vaccine is not taken, the SIM card of the mobile will be blocked

कोरोना लसीकरणासाठी वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती केल्या जात आहे. लशीबाबत अजूनही अनेक नागरिकांच्या मनात संकोच आहे. हा संकोच दूर करण्यासाठी पाकिस्तानच्या पंजाब सरकारने एक वेगळे पाऊल उचलले आहे. लस न घेणाऱ्यांचे सिमकार्ड ब्लॉक केले जाणार आहेत. आरोग्यमंत्री डॉ. यास्मीन रशीद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयाचे उद्दिष्ट शक्य तितक्या लोकांना लसीकरण करणे आहे.

    कराची : कोरोना लसीकरणासाठी वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती केल्या जात आहे. लशीबाबत अजूनही अनेक नागरिकांच्या मनात संकोच आहे. हा संकोच दूर करण्यासाठी पाकिस्तानच्या पंजाब सरकारने एक वेगळे पाऊल उचलले आहे. लस न घेणाऱ्यांचे सिमकार्ड ब्लॉक केले जाणार आहेत. आरोग्यमंत्री डॉ. यास्मीन रशीद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयाचे उद्दिष्ट शक्य तितक्या लोकांना लसीकरण करणे आहे.

    डॉ. रशीद म्हणाले की, राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरणामुळे कोरोना प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. मात्र, प्राथमिक आरोग्य विभागाचा संकलित अहवाल पंजाब प्रांतात लसीकरणाची टक्केवारी कमी आहे. लशीचा पहिला डोस घेणाऱ्या 4 ते 5 लाख लोकांनी लशीचा दुसरा डोस घेतला नाही. पाकिस्तानमध्ये 2 फेब्रुवारीपासून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू झाली आहे.

    आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ज्या लोकांनी लस घेतली नाही. तसेच ज्यांनी लशीसाठी नोंदणी देखील केली नाही. पहिल्या टप्प्यात त्यांना आधी इशारा देण्यात येईल. त्यानंतर अशा लोकांना कोरोना लसीकरणाच्या नोंदणीसाठी आणि लस घेण्यासाठी वेळ निश्चित केली जाईल. पुढील टप्प्यात, उल्लंघन करणाऱ्यांच्या ओळखपत्रांशी जोडलेली सिमकार्ड बंद केली जातील. लस घेतल्यानंतर सिमकार्ड पुन्हा सुरू केले जातील.