इम्रान खान म्हणाले, सत्तेसाठी कधी अल्लाच्या नावाचा उपयोग केला नाही, २० कोटी नागरिकांच्या इमानचा सौदा करतायेत खासदार

पाकिस्तानात इम्रान खान सरकारविरोधात शुक्रवारी अविश्वास प्रस्ताव दाखल होऊ शकला नाही. संसदेचे विशेष अधिवेशन तर सुरु झाले, मात्र दहाव्या मिनिटाला एका खासदाराच्या मृत्युप्रकरणी शोकसंदेश व्यक्त करत, संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यामुळे आता इम्रान खान यांना २८ मार्चपर्यंत सवलत मिळाली आहे.

    इस्लामाबाद : पाकिस्तानात इम्रान खान सरकारविरोधात शुक्रवारी अविश्वास प्रस्ताव दाखल होऊ शकला नाही. संसदेचे विशेष अधिवेशन तर सुरु झाले, मात्र दहाव्या मिनिटाला एका खासदाराच्या मृत्युप्रकरणी शोकसंदेश व्यक्त करत, संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यामुळे आता इम्रान खान यांना २८ मार्चपर्यंत सवलत मिळाली आहे. आता संसदेचे कामकाज २८ तारखेला सुरु होणार आहे, थोडक्यात सरकार वाचवण्यासाठी इम्रान खान यांना आणखी काही कालावधी मिळाला आहे.

    सोमवारी जरी आता अविश्वासदर्शक प्रस्ताव मांडण्यात आला, तरी त्याच्यावर तीन दिवसांनंतर आणि सात दिवसांआधी मतदान होणे आवश्यक आहे. मात्र दुसरीकडे सभापती असद कैसर आणि सुप्रीम कोर्ट हे दोघेही इम्रान खान यांच्यासोबत असल्याचे दिसते आहे. या दोन्हींकडून मतदान टाळण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न होतील अशी शक्यता आहे. तर दुसरीकडे विरोधकांनीही कंबर कसली आहे.

    इम्रान खान काय म्हणाले? 

    दरम्यान इम्रान खान यांनी मनशेरात एका सभेला शुक्रवारी संबोधित केले त्यात, त्यात त्यांनी नेहमीप्रमाणे विरोधकांना चोर, डाकू आणि दरोडेखोर म्हणून त्यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच इम्रान खान म्हणाले की- मी आजपर्यंत सरकार वाचवण्यासाठी किंवा सत्ता मिळवण्यासाठी कधीही इस्लामला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला नाही. कधीही सत्तेसाठी अल्लाच्या नावाच्या उपयोगही केलेला नाही. आज संसदेतील खासदार २०-२५ कोटींसाठी त्यांच्या इमानचा सौदा करीत आहेत.