Imran Khan

मंदिर निर्माणात आलेल्या या नव्या अडचणीची माहिती, या सगळ्यावर देखरेख करणाऱ्या इस्लामाबाद हायकोर्टालाही देण्यात आली आहे. सीडीएच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयाची माहिती सरकारच्या वतीने हायकोर्टाला देण्यात आली आहे. केंद्र सरकारने या मंदिर निर्माणाला मंजुरी दिली होती, मात्र ग्रीम एरियात नवे बांधकाम आणि बिल्डिंग बांधकामाला परावनगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे आता हे मंदिर होऊ शकणार नाही.

    इस्लामाबाद – पाकिस्तानाची राजधानी इस्लामाबादमध्ये आता हिंदू मंदिर होणार नाही. इमरान खान सरकारच्या अखत्यारित असलेल्या कॅपिटल डेव्हलपमेंट अथॉरिटीने मंदिरासाठी देऊ केलेली जमीन रद्द केली आहे. या मंदिर उभारणीवरुन इम्रान सरकारचे कौतुक करण्यात येत होते. पाकिस्तानात अल्पसंख्याकांशी कोणताही भेदभाव करण्यात येत नाही, याचे हे मंदिर प्रतिक ठेरल, असे पाक सरकारच्या मंत्र्यांकडून सांगण्यात येत होते. मात्र आता मंदिरासाठी जमीन न देण्याचा निर्णय़ घेतल्यानंतर सरकारकडून याबाबत कोणतीही भूमिका मांडण्यात आलेली नाही.

    इस्लामाबाद हायकोर्टालाही दिली माहिती

    मंदिर निर्माणात आलेल्या या नव्या अडचणीची माहिती, या सगळ्यावर देखरेख करणाऱ्या इस्लामाबाद हायकोर्टालाही देण्यात आली आहे. सीडीएच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयाची माहिती सरकारच्या वतीने हायकोर्टाला देण्यात आली आहे.

    केंद्र सरकारने या मंदिर निर्माणाला मंजुरी दिली होती, मात्र ग्रीम एरियात नवे बांधकाम आणि बिल्डिंग बांधकामाला परावनगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे आता हे मंदिर होऊ शकणार नाही.

    २०१७ साली दिली होती जमीन

    सीडीएशी चर्चा करुन इम्रान सरकारने राजधानी इस्लामाबादमध्ये अल्पसंख्याक समुदायाच्या मंदिर निर्माणासाठी परावनगी दिली होती. यात मंदिरासह कम्युनिटी सेंटर आणि स्मशानभूमीही तयार करण्यात येणार होती.