ऐकावे ते नवलंच! अमेरिकेत जगातील पहिला रोबोट वकील लढणार केस, कोर्टात करणार युक्तिवाद

हा जगातील पहिला रोबोट वकील असल्याचा दावा कंपनीने केला आहे. रोबोट बनवणाऱ्या कंपनीचे सीईओ जोशुआ ब्रॉउनर यांनी सांगितले, हा कायदा संहिता आणि भाषेचा यांचं संमिश्र स्वरूप आहे.

    सध्या आधुनिक जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करणं सोप झालं आहे. या तंत्रज्ञानामुळे आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी जलद गतीने करता येतात. रोबोट ही तंत्रज्ञानाची दिलेली अशीच एक वस्तू आहे ज्यामुळे अशक्य असलेल्या गोष्टाही सगज करण्यात मदत होते. आता हाच रोबोट न्यायालयात तुमची बाजू मांडताना दिसला तर नवल वाटायला नको. होय, हे खरं आहे. अमेरिकेने अशाप्रकारचा एक रोबोट विकसीत केला आहे जो न्यायालयात केस लढणार आहे.

    अमेरिकेने तयार केला रोबोट

    तांत्रिक दृत्या प्रगत असलेल्या अमेरिकेमध्येAI तंत्रज्ञान वापरुन हा रोबोट वकील तयार करण्यात आला आहे. हा जगातील पहिला रोबोट वकील असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या रोबोटला कायदा संहिता आणि भाषेचा सर्व ज्ञान आहे. अशी माहिती रोबोट बनवणाऱ्या कंपनीचे सीईओ जोशुआ ब्रॉऊनर यांनी सांगितले. याआधी हा रोबोट ग्राहकांना फक्त विलंब शुल्क आणि दंड याबद्दल माहिती द्यायचा. पण आता हा रोबोट खटला लढण्यासाठी सक्षम झाला आहे.

    पहिला रोबोट वकील खटला लढणार
    AI-सपोर्टेड रोबोट वकील म्हणून केस लढण्याची ही पहिलीच वेळ असेल. कंपनीने हा दावा केला आहे की, हा रोबोट वकील हा स्मार्टफोनवर चालतो. हा रोबोट युक्तिवाद करताना उत्तर इअरपीसद्वारे देईल. हा रोबो दंड आणि दंड भरणे कसे टाळायचे ते सांगेल. सध्या हा रोबोट वकील आपली बाजू कशी मांडतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. हा रोबोट वकील किती प्रभावी ठरेल हे भविष्यात सिद्ध होईल.