चीनमध्ये पाळीव मांजरींना झाली  Corona ची लागण

मांजरींच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मांजरींना मारण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला. या प्रस्तावाला मांजरींच्या मालकाने विरोध दर्शवत ऑनलाईन अपिल केले होते. मात्र प्रशासनाने काही न ऐकता तिन्ही मांजरींना मारले आहे.

    चीनमधून प्रसार झालेल्या कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला आहे. अद्याप जग संपूर्णपणे यातून सावरलेले नाही. सर्वत्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वेगाने उपाययोजना केल्या जात आहेत. व्हायरसमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाले आहे. युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. अशातच आणखी चिंता वाढवणारी बातमी चीननमधून समोर आली आहे.

    चीनच्या हार्बिन शहरातील तीन पाळीव मांजरींना कोरोनाची लागण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावले उचलत आहे. यामुळेच प्रशासनाने त्यांना मृत्यूची शिक्षा दिली आहे. २१ सप्टेंबरला तीन मांजरींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते त्यानंतर मांजरींना अन्न-पाणी देऊन त्यांना आयसोलेशनमध्ये सोडण्यात आले होते.

    मांजरींच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मांजरींना मारण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला. या प्रस्तावाला मांजरींच्या मालकाने विरोध दर्शवत ऑनलाईन अपिल केले होते. मात्र प्रशासनाने काही न ऐकता तिन्ही मांजरींना मारले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी “तिन्ही मांजरींना यासाठी मारले कारण प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्यास उपचार उपलब्ध नाहीत. कोरोनाबाधित मांजरी, मालक आणि इमारतीत राहणाऱ्या अन्य लोकांसाठी धोकादायक ठरत होत्या” असे म्हटल्याची माहिती एका हिंदी वृत्त वाहिनीने दिली आहे.