On the one hand the joy of being kissed and on the other hand the wife understood the news of her husbands death during the presentation

पॅरिस : शहरातील पे- डे-डोम भागात एका बंदुकधाऱ्याने केलेल्या हल्ल्यात तीन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणी हस्तक्षेप करत असताना या व्यक्‍तीने पोलिसांवरच गोळीबार केला.

या गोळीबारामध्ये चौथा पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. बंदुकधाऱ्याने एका महिलेला ओलीस ठेवले होते. तिची सुटका करण्यासाठी पुढे सरसावलेल्या पोलिसांवर हा गोळीबार झाला. मंगळवारी मध्यरात्रीनंतर पोलिस या प्रकरणी एका घरी गेले असताना हा प्रकार घडला.

बंदुकधारी व्यक्‍तीने सर्वप्रथम एका पोलिस अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर आणखी एकाला जखमी केले आणि घराला आग लावून दिली. या बंदुकधाऱ्याला रोखण्यासाठी आणखी दोन पोलिस पुढे आले असता त्यांनाही या बंदुकधाऱ्याने गोळ्या घातल्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकारामुळे पोलीस यंत्रणेला मोठा धक्का बसला असून हल्लेखोराच्या शोधासाठी मोठा फौजफाटा पाठवण्यात आला आहे. या प्रकरणातील महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.