
काही दिवसांपूर्वीच लाहोरमधील जोहर टाउनमध्ये दहशतवादी हाफीज सईदच्या घराजवळ स्फोट झाला होता. त्यानंतर आता काही दिवसानंतर लाहोरमध्ये स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या शहरात काही गॅस सिलिंडरचा सलगपणे स्फोट झाला. त्यामुळे घटनास्थळी दाखल होण्यास बचाव पथकाला अडचणींचा सामना करावा लागला.
लाहोर: पाकिस्तानमधील महत्त्वाचे शहर समजले जाणारे म्हणजे लाहोर. या शहर पुन्हा एकदा स्फोटाने हादरले आहे. आज मंगळवारी दुपारच्या सुमारास लाहोरमधील बरकत या बाजारात एकाच वेळी अनेक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे जवळच्या परिसरात मोठे हादरे बसले. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.
या स्फोटाची माहिती अग्निशमन दल, पोलीस आणि इतर यंत्रणांना मिळाली असता, त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. तसेच या यंत्रणांनी मदत व बचाव कार्यास सुरूवात केली आहे. या घटनेची व्हिडिओ देखील समोर आला आहे.
A shop is under fire, adjacent to Barkat Market, New Garden Town Lahore.
Rescue 1122 teams are on site
1 injury reported. pic.twitter.com/PxCYBj8QKP— Azhar Mashwani (@MashwaniAzhar) June 29, 2021
काही दिवसांपूर्वीच लाहोरमधील जोहर टाउनमध्ये दहशतवादी हाफीज सईदच्या घराजवळ स्फोट झाला होता. त्यानंतर आता काही दिवसानंतर लाहोरमध्ये स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या शहरात काही गॅस सिलिंडरचा सलगपणे स्फोट झाला. त्यामुळे घटनास्थळी दाखल होण्यास बचाव पथकाला अडचणींचा सामना करावा लागला. जवळपास १० गॅस सिलिंडर फुटले आहेत. या घटनेत एकाला गंभीर दुखापत झाली आहे. तर आजूबाजूच्या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बरकत बाजार आणि जवळचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.