hcl tech

HCLTech कंपनी रोमानिया देशामध्ये आपला विस्तार करणार आहे. HCLTech कंपनी गेल्या पाच वर्षांपासून रोमानियामध्ये काम करत आहे. ग्राहकांच्या सेवेसाठी देशामध्ये आधीपासूनच सुमारे 1,000 लोकांना रोजगार देत आहे.

सध्या जागतिक आर्थिक मंदीचे (Recession) कारण देत विविध कंपन्या मोठ्या प्रमाणात आपल्या कर्मचारी कपात (Staff Reduction) करत आहेत. अनेक कंपन्यांनी तर दोन वेळा तर काहींनी चार वेळासुद्धा कर्मचारी कपात केली आहे. या कर्मचारी कपातीच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. एका भारतीय कंपनीने या ताळेबंदीच्या वातावरणात अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. HCLTech ने आगामी दोन वर्षांच्या काळात 1,000 कर्मचारी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

PTI च्या वृत्तानुसार HCLTech कंपनी रोमानिया देशामध्ये आपला विस्तार करणार आहे. HCLTech कंपनी गेल्या पाच वर्षांपासून रोमानियामध्ये काम करत आहे. ग्राहकांच्या सेवेसाठी देशामध्ये आधीपासूनच सुमारे 1,000 लोकांना रोजगार देत आहे. तसेच आता कंपनी स्थानिकांना टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये आपले करिअर घडवण्यासाठी अधिक संधी निर्माण व्हाव्यात यासाठी Bucharest आणि Iasi मध्ये आपल्या ऑफिसचा विस्तार करणार आहे. रोमानियामधील स्थानिकांना टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये करिअर करता यावे यासाठी आम्ही गुंतवणूक करत आहोत, असं HCLTech चे रोमानियाचे कंट्री लीड युलियन पडुरारू यांनी सांगितलं. HCLTech ने आपला विस्तार करण्यासाठी रोमानियामध्ये अधिक लोकांना कामावर नियुक्त करण्याचे उचललेले पाऊल देशासाठी आणि एकूणच IT उद्योगासाठी हे एक सकारात्मक पाऊल आहे. कंपनीने घेतला हा निर्णय या देशामध्ये आपला व्यवसाय वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

कर्मचारी कपातीची लाट
Google, Amazon आणि Meta या कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. गुगलने जानेवारीमध्ये 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. मेटा आणि Amazon कंपन्यांनी दोन वेळा कपात केली. त्यामध्ये अनुक्रमे त्यांनी 21,000 आणि 27,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

ट्विटरमध्येही (Twitter) कर्मचारी कपात सुरु आहे. मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने गेल्या महिन्यात कर्मचारी कपात केली. एलन मस्क यांनी ताबा घेतल्यानंतर आठव्यांदा (Twitter 8th Layoff) ट्विटरमध्ये कर्मचारी कपात करण्यात आली. ट्विटरने  सुमारे 200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे. आता 2000 पेक्षा कमी कर्मचारी ट्विटरमध्ये उरले आहेत. एलन मस्क (Elon Musk) यांनी ऑक्टोरबरमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतले, तेव्हापासून त्यांनी सुमारे 7,500 कर्मचार्‍यांपैकी अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे.