भारत आणि पाकिस्तानने काश्मीर प्रश्न शांततेने सोडवावा; चीनचे आवाहन

तीन वर्षांपूर्वी चीनने भारत-पाकिस्ताने संयम आणि समजूतदारपणा दाखवत परिस्थिती बिघडेल किंवा तणाव वाढेल अशी कोणतीही कारवाई नये. आजूबाजूच्या प्रदेशात शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी दोन्ही देशांनी चर्चा करुन वाद सोडवण्याचे आवाहन चीनने केले आहे.

    नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा (Special Status Of Jammu-Kashmir) मिळून म्हणजेच कलम ३७० (Section 370) हटवून तीन वर्षे झाली. त्यानंतरही पाकिस्तान (Pakistan) सातत्याने काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत आहे. काश्मीरप्रश्नाबाबत जगातील इतर देश पाठिंबा देतील किंवा न देतील, पण चीन देईल, अशी पाकिस्तानला आशा आहे. त्यातच भारत आणि पाकिस्तानने चर्चा करून काश्मीर प्रश्न शांततेने सोडवावा (Kashmir Issue Should Be Solved PeaceFully), असे चीनने आवाहन (China Appealed) केले आहे.

    ५ ऑगस्ट २०१९ रोजी नरेंद्र मोदी सरकारने काश्मीरमधून कलम ३७० रद्द केले. भारतीय संविधानाच्या कलम ३७० अन्वये जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळाला आहे. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर भारत सरकारने त्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले.

    भारत आणि पाकिस्तान यांनी चर्चेद्वारे काश्मीरचा प्रश्न शांततेने सोडवला पाहिजे. काश्मीरच्या मुद्द्यावर चीनची भूमिका स्पष्ट आणि सुसंगत आहे. तीन वर्षांपूर्वी चीनने भारत-पाकिस्ताने संयम आणि समजूतदारपणा दाखवत परिस्थिती बिघडेल किंवा तणाव वाढेल अशी कोणतीही कारवाई नये. आजूबाजूच्या प्रदेशात शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी दोन्ही देशांनी चर्चा करुन वाद सोडवण्याचे आवाहन चीनने केले आहे.

    चीनच्या आवाहनला भारताचे प्रत्युत्तर
    जम्मू-काश्मीरशी संबंधित प्रश्न हा पूर्णपणे आमचा अंतर्गत विषय असल्याचे भारताने यापूर्वीही अनेकदा सांगितले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मार्चमध्ये म्हटले होते की, चीनसह इतर कोणत्याही देशांना यावर भाष्य करण्याचा अधिकार नाही. भारत त्यांच्या देशांच्या अंतर्गत प्रश्नांवर जाहीर वक्तव्ये करण्याचेही टाळतो, हे त्यांनी लक्षात घ्यावे, असेही भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.