india become worlds third largest economy will overtake japan

नाणेनिधीच्या प्रवक्त्या गेरी राईस यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भारतीय अर्थव्यवस्थेबाबत स्तुतीचे शब्द काढले. कोरोनाच्या महामारीनंतर चालू वर्षाच्या चौथ्या तिमाहीमध्ये भारतीय अर्थव्यवस्था चांगली सुधारणा दाखविण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या तिमाहीमधील वाढ ही सर्वंकष असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

    वॉशिंग्टन : कोरोना, लॉकडाऊन यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची गती मागील वर्षांपासून मंदावली होती. मात्र आता ही गती चांगली झाली असून, ती सुधारणेच्या मार्गावरून जात असल्याचे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केले आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीबरोबरच गुंतवणूक आणि भांडवल वाढ झालेली दिसून येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

    या वर्षाच्या अखेरच्या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्थेची वाढ चांगली झालेली दिसण्याची शक्यताही नाणेनिधीकडून वर्तविण्यात आली आहे.नाणेनिधीच्या प्रवक्त्या गेरी राईस यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भारतीय अर्थव्यवस्थेबाबत स्तुतीचे शब्द काढले. कोरोनाच्या महामारीनंतर चालू वर्षाच्या चौथ्या तिमाहीमध्ये भारतीय अर्थव्यवस्था चांगली सुधारणा दाखविण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या तिमाहीमधील वाढ ही सर्वंकष असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.