भारतीय दुतावासाचा युक्रेन मधील भारतीय नागरिकांनी सल्ला ‘परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता लवकरात लवकर युक्रेन सोडावे’

    युक्रेनची बिघडलेली परिस्थिती आणि होत असलेले हल्ले लक्षात घेता भारतीय दुतावासाने एक परिपत्रक जारी केले आहे. बुधवारी भारतीय दूतावासाने अॅडव्हायझरी  जारी करत भारतीय नागरिकांना युक्रेनमध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे. रशियामुळे युक्रेनचे  टेन्शन आणखी वाढत चालले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी मार्शल लॉबाबत स्वाक्षरी केली असून त्यामुळे आता युक्रेनमध्ये परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    युक्रेनच्या लुहान्स्क, डोनेस्तक, झापोरिझ्झ्या आणि खेरसन या चार शहरांचा यामध्ये समावेश आहे. या शहरांवर रशियाने बेकायदेशीरपणे ताबा मिळवला होता. मार्शल लॉ लागू करण्याच्या घोषणेनंतर, रशियाच्या सर्व प्रदेशांच्या प्रमुखांना अतिरिक्त आपत्कालीन अधिकार मिळाले आहेत. या भागांमधील परिस्थिती आणखी बिघण्याची शक्यता आहे.

    सध्या युक्रेनमधील परिस्थिती पुन्हा गंभीर होत चालली आहे. रशियाकडून युक्रेनमधील अनेक शहरांवर सोमवारी ड्रोन हल्ले करण्यात आले. युक्रेनने जारी केलेल्या माहितीनुसार, या ड्रोन हल्ल्यामध्ये एका प्रेग्नेंट महिलेसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाकडून युक्रेनवर एकापाठोपाठ हल्ले सुरुच आहे.