स्विस बँकेत भारतीयांचे 20,700 कोटी जमा; कोरोना काळातही मोठी वाढ 

स्विस बँकांमधील भारतीयांनी ठेवलेल्या पैशांमध्ये कोरोना काळातही मोठी वाढ झाली आहे. तब्बल 20 हजार कोटींहून अधिक रक्कम विविध बँकांमध्ये जमा आहे. या पैशांची रक्कम इतकी आहे की, गेल्या 13 वर्षांचा विक्रम मोडला आहे. स्विझर्लंडच्या केंद्रीय बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीत हे उघड झाले आहे. आकडेवारीनुसार, 2020 मध्ये स्विस बँकेत भारतीयांना आणि भारतीय कंपन्यांनी जवळपास 2.55 अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच 20,700 कोटी रुपये जमा केले आहेत.

    दिल्ली : स्विस बँकांमधील भारतीयांनी ठेवलेल्या पैशांमध्ये कोरोना काळातही मोठी वाढ झाली आहे. तब्बल 20 हजार कोटींहून अधिक रक्कम विविध बँकांमध्ये जमा आहे. या पैशांची रक्कम इतकी आहे की, गेल्या 13 वर्षांचा विक्रम मोडला आहे. स्विझर्लंडच्या केंद्रीय बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीत हे उघड झाले आहे. आकडेवारीनुसार, 2020 मध्ये स्विस बँकेत भारतीयांना आणि भारतीय कंपन्यांनी जवळपास 2.55 अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच 20,700 कोटी रुपये जमा केले आहेत.

    ही रक्कम मागील 13 वर्षातील सर्वाधिक आहे. 2019 च्या अखेरीस स्विस बँकेत भारतीयांनी जमा केलेल्या पैशांची रक्कम जवळपास 89.9 कोटी फ्रँक्स (6,625 कोटी रुपये) होती. 2020 च्या अखेरीस ही एकूण रक्कम वाढून 20,706 कोटी रुपये इतकी झाली. या रकमेत 4,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक कस्टमर डिपॉजिट, 3100 कोटी रुपयांपेक्षा अधिक दुसऱ्या बँकांच्या माध्यमातून, 16.5 कोटी रुपये ट्रस्टच्या माध्यमातून आणि जवळपास 13,500 कोटी रुपये बॉन्ड, सिक्युरिटीज आणि वेगवेगळ्या आर्थिक पर्यायांशी संबंधित गोष्टींचा समावेश आहे.

    2006 मध्ये नवा विक्रम

    यापूर्वी 2006 मध्ये भारतीय ठेवींनी 6.5 अब्ज स्विस फ्रँकची विक्रमी नोंद गाठली होती. परंतु त्यानंतर 2011, 2013 आणि 2017 वगळता भारतीयांनी स्विस बँकांमध्ये पैसे जमा करण्यात फारसा रस दाखविला नाही. परंतु 2020 ने जमा रक्कमेचा सर्व आकड्यांचे रेकॉर्ड मोडले. 2020 मध्ये जेथे खासगी ग्राहकांच्या खात्यात भारतीय ठेवींमध्ये सुमारे 4000 कोटी रुपये होते, तर इतर बँकांमार्फत 3100 कोटी रुपये जमा झाले. तसेच सर्वाधिक 13 हजार 500 कोटी रुपये बाँड, सुरक्षा ठेव व इतर माध्यमांद्वारे गुंतविण्यात आले आहेत. ही आकडेवारी अधिकृत असून काळ्या पैशाशी या आकडेवारीचा संबंध नसल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.

    सर्व पैशांचा हिशोब

    स्विस बँकेत भारतीयांनी जमा केलेले पैसे व्यक्ती, बँका आणि एंटरप्रायजेसकडून जमा करण्यात आले आहेत. यात भारतीय, एनआरआय किंवा इतर लोकांचे थर्ड कंट्री एंटिटीजच्या नावाने जमा होणाऱ्या पैशाचा समावेश नाही. ग्राहकांच्या खात्यातील ठेवी मात्र घटल्या आहेत. हे अधिकृत आकडे असून भारतीयांनी दडविलेल्या काळ्या पैशाशी या आकडेवारीचा संबंध नसल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.

    हे सुद्धा वाचा