चीन विरुद्ध भारताचा आक्रमक पवित्रा; सीमेवर तैनात केले 50,000 सैनिक

चीनच्या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी सुमारे दोन लाख सैनिक तैनात करण्यात आले आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत 40 टक्के जास्त आहे. मात्र भारतीय लष्कराच्या आणि पंतप्रधान कार्यालयाच्या (पीएमओ) प्रवक्त्यांनी यासंदर्भातील कोणतीही माहिती दिलेली नाही. यासोबत भारतीय हवाई दलाची विमानेही सीमेवर सज्ज करण्यात आली आहेत. ही लढाऊ विमाने चीनला लागून असलेल्या तीन भागांमध्ये तैनात आहेत.

  लडाख : गेल्या वर्षापासून लडाख सीमेजवळील सुरू असलेल्या चीनच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत भारताने कमीतकमी 50,000 अतिरिक्त सैनिक सीमेवर तैनात केले आहे. गेल्या काही महिन्यांत चीनच्या सीमेजवळील तीन वेगवेगळ्या भागात भारताने सैन्य आणि फायटर विमाने तैनात करण्यात आली आहेत. सध्या चीनच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी एकूण दोन लाखांच्या वर सैन्य सीमेवर तैनात करण्यात आले आहे.

  गेल्यावर्षीच्या तुलनेत 40% जास्त

  आता चीनच्या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी सुमारे दोन लाख सैनिक तैनात करण्यात आले आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत 40 टक्के जास्त आहे. मात्र भारतीय लष्कराच्या आणि पंतप्रधान कार्यालयाच्या (पीएमओ) प्रवक्त्यांनी यासंदर्भातील कोणतीही माहिती दिलेली नाही. यासोबत भारतीय हवाई दलाची विमानेही सीमेवर सज्ज करण्यात आली आहेत. ही लढाऊ विमाने चीनला लागून असलेल्या तीन भागांमध्ये तैनात आहेत.

  भारताच्या धोरणात बदल

  गेल्या वर्षी 15 जून रोजी पूर्व लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये चिनी सैन्याने भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानसोबतचे प्रकरण शांत ठेवत चीनच्या सीमेवर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण अवलंबिले आहे. यापूर्वीही सीमेवर चिनी अतिक्रमण रोखण्यासाठी भारताने सैन्य तैनात केले होते, पण आता सैन्यात वाढ करून आक्रमण रोखण्याची आणि चीनच्या सीमेत प्रवेश करण्याची क्षमता वाढवण्यात आली आहे. भारत यापुढे चीनविरुद्ध आक्रमक संरक्षण धोरण अवलंबण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे सूत्रांनी म्हटले आहे.

  लडाख सीमेवर चीनचा युद्धसराव

  • जून 2020 मध्ये लडाखच्या गलवान व्हॅलीतील चिनी सैन्यासह झालेल्या संघर्षानंतर सीमेवर अद्याप शांतता नाही.
  • दोन्ही देशांचे सैन्य अजूनही एकमेकांसमोर उभे आहेत. पूर्व लडाखमधील तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच चीनकडून कुरापती सुरूच आहे.
  • चीनने पूर्व लडाखमधील सीमा भागात सैन्याच्या कारवाया वाढवल्या आहेत.
  • या भागात चीनने युद्धसराव सुरू केला आहे. तरी, चीनच्या प्रत्येक हालचालीवर भारत बारीक लक्ष ठेवून आहे.
  • सीमेजवळील हवाई कारवायांबरोबरच चीनच्या युद्ध अभ्यावर लक्ष ठेवून आहे असे भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.