भारताचे हिंदुत्व पाकिस्तानसाठी धोकादायक, काश्मीरही अजेंड्यावर, दिवाळखोर पाकिस्तानच्या पहिल्या सुरक्षा धोरणात काय?

भारतात ज्या पद्धतीने राजकीय फायद्यासाठी, कथित उन्माद पसरवण्यात येतो आहे, तो पाकिस्तानसाठी मोठा धोका असल्याचे मत युसूफ यांनी व्यक्त केले आहे. काश्मीरप्रश्नावर भारत जी पावले उचलीत आहे, ती योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. जम्मू-काश्मीर प्रश्न हा दोन्ही देशांतील संबंधातीली महत्त्वाचा मुद्दा राहील आणि याबाबत पाकिस्तानची भूमिका स्पष्ट असल्याचा पुरुच्चार त्यांनी केला.

  इस्लामाबाद- पाकिस्तानने आपली पहिले सुरक्षा धोरण जाहीर केले आहे. ११० पानांच्या या धोरणातील ५० पाने सार्वजनिक करण्यात आली आहेत. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, असे यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले आहे. त्यामुळे आर्थिक दिवाळखोरीतून कसे बाहेर पडायचे, हा मुख्य मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले. तर पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोहद युसूफ यांनी सांगितले की, या धोरणाचा मुख्य उद्देश हा आर्थिक सुरक्षेतून नागरिकांची सुरक्षा आहे. यानंतर लगेचच भारताचे हिंदुत्व हे पाकिस्तानसाठी धोकादायक असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले आहे.

  भारतात ज्या पद्धतीने राजकीय फायद्यासाठी, कथित उन्माद पसरवण्यात येतो आहे, तो पाकिस्तानसाठी मोठा धोका असल्याचे मत युसूफ यांनी व्यक्त केले आहे. काश्मीरप्रश्नावर भारत जी पावले उचलीत आहे, ती योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. जम्मू-काश्मीर प्रश्न हा दोन्ही देशांतील संबंधातीली महत्त्वाचा मुद्दा राहील आणि याबाबत पाकिस्तानची भूमिका स्पष्ट असल्याचा पुरुच्चार त्यांनी केला.

  धोरण नवे पण काश्मीरबाबत जुनीच रीत

  काश्मीरचा प्रश्न पाकिस्तानच्या अजेंड्यावर असेल, याचा पुनरुच्चार या सुरक्षा धोरणात करण्यात आला आहे. भारतासोबत संपर्क वाढवण्याचा राग युसूफ यांनी आळवला. दोन्ही देशातील आर्थिक संबंध वाढवण्याची आवश्यकता असल्याच्या मुद्द्यावरही जोर दिला.

  सैन्यासमोर प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न

  पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच असे सुरक्षा धोरण आणण्यात आल्याचे इम्रान खान सांगत आहेत. वास्तविक पाकिस्तानी सैन्यासमोर आपली प्रतिमा उंचावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आत्तापर्यंतच्या सरकारांनी केवळ सैन्यावरच आपले लक्ष केंद्रीत केले होते. त्यामुळे कल्याणकारी योजना जनतेपर्यंत जाव्यात ही भूमिकाच आत्तापर्यंत कुणी घेतली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.