मेक्सिकोच्या सिटी हॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार; महापौरांसह १८ जणांचा मृत्यू

    अमेरिकेच्या मेक्सिको (Mexico Firing) सिटीमध्ये पुन्हा अंदाधुंद गोळी बारातून एक मोठी दुर्घटनाघडली आहे. मेक्सिको येथील सिटी हॉलमध्ये सामूहिक गोळीबार झाला असून त्यात किमान १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये शहरातील महापौरांचाही (Mayor) समावेश आहे.

    मेक्सिकन सिटी हॉलमध्ये एक कार्यक्रम सुरू होता त्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने हॉलमध्ये प्रवेश केला. तो व्यक्ती काही सेकंद थांबला आणि अचानक त्याने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात १८ जणांचा मृत्यू झाला. यात महापौरांव्यतिरिक्त त्यांचे वडील, माजी महापौर आणि महापालिका अधिकारी तसेच पोलिसांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    दरम्यान संबंधित घटनेची काही छायाचित्रे समोर आली असून यात एका भिंतीवर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा दिसत आहेत. किमान ३०-३५ गोळ्या दिसत आहेत. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले असून आहे. या संपूर्ण प्रकरणावर अद्याप अधिकृत वक्तव्य आलेले नसून एका संघटनेने मात्र या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे.